महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

त्यांनी 50 वर्षांनंतर विनामोबदला जागा दिली मुळ मालकाच्या ताब्यात

01:01 PM Feb 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

जयसिंगपुरातील घटना : आत्तार-धनवडे कुटुंबांनी जपला कौटुंबिक सलोखा

Advertisement

जयसिंगपूर  प्रतिनिधी

अलीकडच्या काळामध्ये बांध फोडून जागा हडप केली जात आहे, कुणाचा बांध थोडा-थोडा पुढे सरकवून इंचाइंचाने जागा हडप करण्याचे प्रकार घडत आहेत. rत्यातील वादातून प्रकरणे न्यायालयांपर्यत पोहोचत आहेत, अशा काळात, माणुसकी, प्रामाणिकपणा जपत 40 वर्षांनंतर भाडेकरूने मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा विना मोबदला मूळ मालकाला परत केली. जयसिंगपूरमध्ये अकराव्या गल्लीतील लाखोची जागा मूळ मालकांना विना मोबदला परत करण्याची वृत्ती आत्तार कुटुंबीयांनी दाखवत कौटुंबिक सलोखाही जपला.

Advertisement

ज्या मातीत आणि ज्यांच्या सहकार्यामुळे आपण मोठे झालो, नाव कमावले, त्यांना विसरायचे नाही, असे संस्कार झालेल्या आत्तार कुटुंबीयांनी शहराच्या मध्यवस्तीत शिवाजी चौकातील 50 वर्षे ताब्यात असलेली जागा विना मोबदला मुल मालकांच्या ताब्यात दिली. बेकिंग अरोना (झाडाखालची बेकरी) गल्ली नंबर 11 शिवाजी चौक हे घर 1976 मध्ये बाबुराव धनवडे यांच्याकडून बाबासाहेब अत्तार यांनी अन्वर जमादार यांच्या मध्यस्थीने भाड्याने घेतले होते. त्यानंतर तेथे त्यांनी बेकरी सुरू केली. बाबासाहेब अत्तार व त्यांच्या चार भावांनी अपार कष्टाच्या जोरावर जयसिंगपुरात बेकरी व्यवसायात आज नावलौकिक मिळवला आहे. तसेच कै. प्रकाश धनवडे आणि कै. बाळासाहेब अत्तार यांच्या दुसऱ्या पिढीनंतर पिंटू ऊर्फ प्रशांत धनवडे व डॉ. रईस अत्तार अशी तिसरी पिढी गुण्यागोविंदाने हे नाते जपत राहिले व व्यवहार सांभाळत व्यवसाय करत होते.

दरम्यान, शनिवारी 3 फेब्रुवारीला अर्शद अत्तार, रईस अत्तार, जैनुद्दीन अत्तार, इमामुद्दिन अत्तार व समस्त अत्तार कुटुंबीयांनी उमेश धनवडे, अन्वर जमादार, मधु लहुटे यांच्या उपस्थितीत शाल, नारळ पान-सुपारी देऊन पिंटू धनवडे व त्यांच्या आई रोहिणी धनवडे यांना त्यांचे हे घर ताब्यात दिले.

शिवाजी चौकातील बेकिंग अरोना बेकरी गेली 48 वर्ष कै. प्रकाश धनवडे परिवारांच्या जागेत कार्यरत होती. इतकी वर्ष जागा ताब्यात असून देखील अर्शदभाई अत्तार व त्यांचे भाऊ जैनुद्दीन अत्तार, इमामोद्दीन अत्तार आणि पुतण्या रईस अत्तार आणि परिवाराने ही जागा कोणत्याही परिस्थितीत मूळ मालकांना परत द्यायची ती ही कोणत्याही मोबदल्याशिवाय.., असा निर्णय घेतला. अन् तो अंमलातही आणला.
गेल्या 48 वर्षांमध्ये या बेकरीच्या माध्यमातून अत्तार परिवाराने शहर आणि परिसरात बेकरी व्यवसायामध्ये नाव केले आहे. बी.एस. बेकरी म्हणून ते परिचित आहेत. शिवाजी चौकातील याच जागेत आग लागून धनवडे यांचे देखील घर जळून प्रचंड नुकसान झाले आहे. अशावेळी अत्तार परिवाराने निर्णय घेत दुकानाची जागा मुळ मालकांना विना मोबदला परत दिली आहे. या कौटुंबिक सलोख्याचा आगळा वेगळा कार्यक्रम आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व संजय पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत झाला. आत्तार आणि धनवडे कुटुंबीयांतील सलोखा आदर्शवत ठरला आहे.

Advertisement
Tags :
kolhapurSaving watertarun bharat news
Next Article