महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एससीओ परिषदेसाठी इस्लामाबादमध्ये पोहोचले जयशंकर

06:05 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

9 वर्षानंतर भारतीय विदेश मंत्र्यांचा पाकिस्तान दौरा

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

विदेशमंत्री एस. जयशंकर हे बुधवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत भाग घेण्यासाठी मंगळवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचले आहेत. पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नूर खान वायुतळावर त्यांचे स्वागत केले. जयशंकर हे एससीओ सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून आयोजित मेजवानीत सामील होण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान संबंध सुरळीत नसताना जयशंकर यांचा हा दौरा होत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पासून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर हे संबंध आणखी बिघडले. कुठल्याही शेजाऱ्याप्रमाणे भारत निश्चितपणे पाकिस्तानसोबत चांगले संबंध राखू इच्छितो. परंतु सीमापार दहशतवाद जारी राहिल्याने असे घडू शकत नसल्याचे जयशंकर यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.

9 वर्षांनी भारताचे विदेशमंत्री पाकिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये तत्कालीन विदेशमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तान दौऱ्यावर गेल्या होत्या. सुषमा स्वराज या पाकिस्तानच्या राजधानीत अफगाणिस्तान विषयक झालेल्या परिषदेत भाग घेण्यासाठी पोहोचल्या होत्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article