बेंगळूर बुल्सकडून जयपूर पँथर्स पराभूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2025 च्या प्रो-कब•ाr लीग स्पर्धेतील दिल्लीच्या टप्प्यात खेळविण्यात आलेल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बेंगळूर बुल्सने जयपूर पिंक पँथर्सचा 47-26 अशा 21 गुणांच्या फरकाने दणदणीत पराभव केला.
या सामन्यात बेंगळूर बुल्स संघातील अलिरझा मिर्झानीने पुन्हा एकदा शानदार अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविताना सुपर 10 गुण नोंदविले. बेंगळूर बुल्स संघातील योगेशने 8 गुण तर दीपक शंकरने 5 गुण नोंदविले. बेंगळूर बुल्स संघातील अलिरझा मिर्झानीने या स्पर्धेच्या इतिहासात आणखी एक वैयक्तिक विक्रम करताना आपल्या चढाईवर 100 गुणांचे शतक पूर्ण केले. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांच्या कालावधीत बेंगळूर बुल्सने जयपूर पिंक पँथर्सवर 12-8 अशी 4 गुणांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या 10 मिनिटांच्या कालावधीत बेंगळूर बुल्सच्या बचावफळीची कामगिरी अधिक सरस झाली. सामन्याच्या पहिल्या सत्राचे बेंगळूर बुल्सने जयपूर पिंक पँथर्सवर 18-13 अशी बडत मिळविली होती.