तुरुंगातून पळून जाणे येथे वैध
चालणार नाही खटला
कुठल्याही गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला तुरुंगात डांबले जाते. अशा स्थितीत तो व्यक्ती तुरुंगातून पसार झाल्यास त्याला गुन्हा मानले जाते. परंतु एका देशात तुरुंगातून पळून जाणे गुन्हा नाही. तेथे तुरुंगातून कैद्याने पलायन केल्यास त्याला गुन्हा मानले जात नाही.
सर्वसाधारणपणे अन्य देशांच्या तुलनेत जर्मनीत तुरुंगातून पळून जाण्यावरून वेगळा विचारा आहे. जर्मनीत तुरुंगातून पळून जाणे गुन्हा नाही. यामागे एक कारण असून जे लोकांच्या मानसिकतेवर निर्भर आहे. व्यक्तीचा स्वतंत्र होणे हा त्याचा अधिकार आहे. याचमुळे तुरुंगातून पळून जाणे गुन्हा नसल्याचे जर्मनीत मानले जाते.
जर्मनीने दुसऱ्या महायुद्धानंतर स्वत:च्या न्यायप्रणालीत अनेक बदल केले आहेत. येथील कायद्यांमध्ये मानवाधिकारांचे रक्षण आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला प्राथमिकता देण्यात आली आहे. तुरुंगातून पळून जाणे एक स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचे तेथे मानले जाते. जेव्हा एखादा व्यक्ती अत्यंत त्रास सहन करत असेल, तेव्हा तो तुरुंगातून पळून जाणारच असे तेथे मानण्यात येते.
जर्मनीत या कायद्यामागे अनेक खास युक्तिवाद आहेत. जर्मनीने स्वत:च्या घटनेत मानवाधिकारांना सर्वप्रथम स्थानदिले आहे. जर एखाद्या व्यक्तीला तुरुंगात राहण्याची स्थिती योग्य वाटत नसेल तर त्याला पळून जाण्याचा अधिकार आहे. ही व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करण्याची एक पद्धत आहे. याचबरोबर जर्मनीत तुरुंग केवळ दंड नसून सुधाराचे स्थान असावे असा विचार आहे.