For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जय शहा आयसीसीमध्ये जाणार?

06:27 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
जय शहा आयसीसीमध्ये जाणार
Advertisement

वृत्तसंस्था / वृत्तसंस्था

Advertisement

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी स्पर्धा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या अध्यक्षपदासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. जय शहा या निवडणुकीत प्रत्याशी असणे शक्य आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या अध्यक्षस्थानी ग्रेग बर्कले हे आहेत. ते गेली चार वर्षे या पदावर आहेत. त्यांचा कालावधी आता संपत आला असला तरी ते आणखी एका कालावधीसाठी पात्र आहेत. त्यामुळे यंदा या अध्यक्षपदासाठी जय शहा आणि बर्कले यांच्यात चुरशीची स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जुलैच्या मध्यानंतर आयसीसीची वार्षिक परिषद श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे होईल. या परिषदेत अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निर्धारित केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. जय शहा यांनी या पदासाठी निवडणुकीत सहभाग घेण्यासंबंधी अद्याप कोणतेही व्यक्तव्य केलेले नाही.

Advertisement

परिवर्तनाची आवश्यकता

आयसीसीच्या नियमांमध्ये आणि कार्यपद्धतीत परिवर्तन होणे आवश्यक आहे, असे जय शहा यांचे मत आहे. त्यामुळे ते आयसीसीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडीज येथे नुकतीच आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली. मात्र, या स्पर्धेच्या व्यवस्थापनात अनेक त्रुटी होत्या. त्या दूर करण्यासाठी आयसीसीच्या कार्यपद्धतीत परिवर्तन होणे आवश्यक असल्याचे अनेक तज्ञांचेही मत आहे. जय शहा त्यादृष्टीने पावले टाकत आहेत.

कालावधीत परिवर्तन

आयसीसी अध्यक्षपदाचा कालावधी नुकताच दोन वर्षांवरुन तीन वर्षे करण्यात आला आहे. मात्र, तीन वर्षांनंतर पुन्हा या पदासाठी निवडणुकीत स्पर्धा करायची असेल तर ती एकदाच करता येणार आहे. पूर्वी एका कार्यकाळानंतर दोनवेळा निवडणुकीत स्पर्धा करण्याची मुभा होती, अशी माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.