For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमेश गंगणेला ‘जय गणेश श्री’ किताब

10:35 AM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
उमेश गंगणेला ‘जय गणेश श्री’ किताब
Advertisement

बेळगाव : बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग आणि स्पोर्ट्स संघटना आयोजित जय गणेश श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत फ्लेक्स जिमच्या उमेश गंगणेने आपल्या पिळदार शरीरराच्या जोरावर ‘जय गणेश श्री’ किताब पटकाविला, तर विक्रम मुसळे उत्कृष्ट पोझर ठरला. रामनाथ मंगल कार्यालय येथे झालेल्या जय गणेश श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मिहीर पोतदार,डॉ संजय सुंठकर, डॉ संजय  कदम, बसनगौडा पाटील, कृष्णा कुरळे, राघवेंद्रगौड पाटील, संभाजी मेलगे, राकेश कलघटगी, नारायण किटवाडकर, बी. प्रकाश, किशोर गवस, उत्तम नाकाडी, सागर कोळी, आनंद आपटेकर, महेश सातपुते, रणजीत किल्लेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे 95 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला.

Advertisement

सविस्तर निकाल पुढील प्रमाणे

55 किलो गट 1) विनायक पातऊट (फ्लेक्स जिम), 2) पांडुरंग (फ्लेक्स जिम खानापूर), 3) श्रीहरी बेळगावकर (जीनाप्पा वस्ताद तालीम), 4) सोम गुरंग (ओम फिटनेस), 5) आशिक हवालदार (खानापूर व्यायाम मंदिर )

Advertisement

 60 किलो गट-1) तुषार गावडे (ऊद्र जिम), 2) फैजान कणबर्गी (फिटनेस क्लब), 3) ओमकार गवस (बर्नौट जिम), 4) अभिषेक एच (रोलिंग म्युझिक), 5) शुभम मुतगेकर (ओम फिटनेस).

65 किलो गट - 1) उमेश गंगणे (फ्लेक्स जिम), 2) संतोष अणवेकर (पीके जिम), 3) ऋषभ गोवेकर (आयुष जिम), 4) विक्रम मुसळे (वी स्केअर), 5) दुर्गप्पा कोटबागी (ऑलम्पकि जिम).

70 किलो गट 1) ओम पाटील, (किल्लेकर जिम), 2) संकेत सुरूतकर (समर्थ जिम), नागेश चार्लेकर (फ्लेक्स जिम-खानापूर), 4) आदित्य सुळगेकर (जे बी फिटनेस), 5) यश भोसले (गोल्डन जिम),

75 किलो गट -1)सादिक मुल्ला (थंडर फिटनेस), 2)स्वप्नलि कपलेश्वर (मोरया जिम), 3) राजबा उस्ताद (मोरया जिम), 4) आकाश लोहार (अल्फा फिटनेस), 5) मनीष सांबरेकर (हनुमान तालीम),

80 किलो गट- 1) मनीष सुतार (फिटनेस), 2) शिवम बिर्जे (स्टेंग्थ स्टुडिओ), 3)स्वंयम रबकवी (बर्न आउट),4)भूषण सावंत (समर्थ व्यायाम शाळा), 5) युवराज राक्षे (ऊद्र जिम),

80 किलो वरील गट 1) दिग्वजिय पाटील (फ्लेक्स खानापूर), 2) हर्षद पाटील (रॉ फिटनेस), 3) करण जाधव (छत्रपती व्यायाम शाळा), 4) यलगोंडा पाटील (फ्लेक्स जिम), 5) रोहन कळसेकर (ऊद्र जिम)

जय गणेश श्री किताबासाठी विनायक पातऊट, तुषार गावडे,  उमेश गंगणे, ओम पाटील, मनीष सुतार,दिग्वविजय पाटील यांच्यात लढत झाली. उमेश गंगणे व दिग्वविजय यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये प्लेक्स जिमच्या उमेश गंगणे आपल्या पिळदार शरिराच्या जोरावर ‘जय गणेश श्री’ किताब पटकाविला. उत्कृष्ट पोझर विक्रम मुसळे, मोस्ट इम्प्रुड बॉडी बिल्डरचा बहुमान ओम पाटीलने पटकाविला. प्रमुख पाहुणे मिहीर पोतदार, डॉ. संजय सुंठकर, डॉ. संजय कदम, बसनगौडा पाटील, कृष्णा कुरळे, राघवेंद्रगौड पाटील, संभाजी मेलगे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व आंतरराष्ट्रीय पंच राजेश लोहार, राष्ट्रीय पंच अनिल आमरोळे, रणजीत किल्लेकर, जिल्हा पंच चेतन ताशीलदार, सुनील बोकडे, सुनील चौधरी, भरत बाळेकुंद्री, बाबू पावशे, नागेंद्र मडिवाळ, विजय चौगुले, नारायण चौगुले, संतोष सुतार, प्रकाश कालकुंद्रीकर व श्रीधर बारटक्के यांनी काम पाहिले तर स्टेज मार्शल म्हणून राजू पाटील, दीपक कित्तूर, सोमनाथ हलगेकर यांनी काम पाहिले.

शरीरसौष्ठवपटूचा व्हेगातर्फे खास गैरव

जग गणेश श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत व्हेगातर्फे सात वजनी गटामधील पहिल्या तीन क्रंमाकाच्या मानकरीना व्हेगाचे हेल्मेट देण्यात आले. शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावत प्रथमता वाटप केल्याने सर्वत्र व्हेगाचे कौतुक केले जात आहे.

Advertisement
Tags :

.