For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनोलीतील जागृत दुर्गामाता मंदिर परिसराचा होणार कायापालट

10:48 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोनोलीतील जागृत दुर्गामाता मंदिर परिसराचा होणार कायापालट
Advertisement

विकासकामांसाठी हालचाली गतिमान, ट्रस्टींसह मान्यवरांकडून जागेची पाहणी

Advertisement

वार्ताहर/किणये

सोनोली गावातील जागृत दुर्गामाता मंदिर परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. विविध विकासकामांच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. गुरुवार दि. 19 रोजी सकाळी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सूचनेवरून मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली. सोनोली येथील दुर्गादेवी मंदिर हे जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या अधिक आहे. तालुक्याच्या विविध भागातील भाविक मंगळवारी व शुक्रवारी मंदिराकडे येऊन दर्शनाचा लाभ घेतात. नवसाला पावणारी ही देवी म्हणून या भागात प्रसिद्ध आहे.

Advertisement

या मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या मंदिर परिसरात सभागृह, स्वयंपाक खोल्या, शौचालय आदी बांधण्यात येणार आहे. तसेच विद्युत पुरवठाही करण्यात येणार आहे. याचबरोबर मंदिर परिसराच्या विकासाला अनुसरुन कामकाज केले जाणार आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पीए सोमू, युवराज कदम, अभियंते एम. एम. मुतगेकर यांच्यासह ट्रस्ट कमिटीचे गुरुनाथ पाटील, दत्तू पाटील, शिवाजी कडोलकर, मनोहर झंगरुचे, परशराम झंगरुचे, अरुण पाटील, गुंडू कणगुटकर, प्रकाश पाटील, अशोक कडोलकर, परशराम पाटील, लक्ष्मण झंगरुचे, रमेश पाटील, पी. एन. झंगरुचे आदींसह गावकरी उपस्थित होते. गावातील या जागृत दुर्गामाता देवी मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Tags :

.