महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरडीएक्स प्रकरणात जगतार हवारा निर्दोष

06:47 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चंदीगड न्यायालयाचा निर्णय : सबळ पुरावे सादर करण्यात पोलिसांना अपयश

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

खलिस्तानी दहशतवादी जगतार सिंग हवारा याची चंदीगड जिल्हा न्यायालयाकडून 18 वर्षे जुन्या गुन्हेगारी खटल्यातून शुक्रवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरडीएक्स प्रकरणात पोलिसांना कोणताही ठोस पुरावा सादर करता आला नाही. पोलिसांनी नाव दिलेल्या साक्षीदाराचा मृत्यू झाला आहे. याच कारणामुळे दहशतवाद्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

खलिस्तानी दहशतवादी जगतार सिंग हवारा याच्याविरुद्ध 2005 मध्ये सेक्टर 17 पोलीस ठाण्यात देशाविऊद्ध कट रचणे, स्फोटक कायदा आणि शस्त्रास्त्र कायदा या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला दिल्ली तुऊंगात ठेवण्यात आले होते. त्याच्याविरोधातील फौजदारी खटल्याची सुनावणी चंदीगडमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यापूर्वी 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयाने हवारा याची अशाच एका फौजदारी खटल्यातून निर्दोष मुक्तता केली होती. 2005 साली सेक्टर 36 पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणी जगतार सिंग हवारा सध्या दिल्लीच्या मंडोली तुऊंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सुरक्षा व्यवस्थेमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणात त्याची हजेरी सातत्याने सुरू होती. यापूर्वी हवारा आणि त्याच्या इतर साथीदारांनी 1995 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग यांना बॉम्बने उडवून दिले होते. हवारासोबतच त्या प्रकरणात परमजीतसिंग भयोरा, बलवंतसिंग राजोआना, जगतारसिंग तारा आणि इतर अनेक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. हवारा आपल्या साथीदारांसह 2004 मध्ये बुरैल कारागृहात बोगदा खोदून फरार झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article