मोदगा येथे गुऱ्हाळ घरांना प्रारंभ
चवदार, रुचकर गूळ बेळगाव बाजारपेठेत दाखल : अन्य गावांमध्येही गुऱ्हाळ घरे सुरू करण्याची लगबग
वार्ताहर/सांबरा
मोदगा (ता. बेळगाव) येथे गुऱ्हाळ घराना प्रारंभ झाला असून, येथील चवदार व रुचकर गूळ बेळगाव बाजारपेठेत दाखल झाले आहे. दरवर्षी दसरा झाल्यानंतर पूर्व भागामध्ये सर्वप्रथम मोदगा येथे गुऱ्हाळ घराना प्रारंभ करण्यात येतो. त्या पाठोपाठ मारिहाळ, सुळेभावी, सांबरा, बाळेकुंद्री आदी गावातील गुऱ्हाळ घरांना प्रारंभ करण्यात येतो. सध्या मोदगा येथील गुऱ्हाळ व्यावसायिक शिवाजी रामनेसह अन्य दोघांनी गुऱ्हाळ घराना प्रारंभ केला आहे. ‘अन्य गुऱ्हाळ घरे सुरू करण्यासाठीची लगबग’ सध्या अन्य गावांमध्ये ही ग्रुहाळ घरे सुरू करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मंडप उभारणे, इंजिन बसविणे, चिपाड गोळा करणे व मजुरांची जमवा जमव करणे आदी कामांमध्ये गुऱ्हाळ व्यावसायिक गुंतले आहेत. पुढील पंधरा ते वीस दिवसात सर्व गुऱ्हाळ घरे सुरू होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आह
अनेकांना रोजगार उपलब्धङ ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू झालेली ग्रुहाळघरे जवळजवळ मार्च महिन्यापर्यंत सुरू राहतात किमान पाच ते सहा महिने ग्रुहाळ हंगाम चालतो. एका ग्रुहाळ घरात ऊस तोडणी पासून ते गुळ तयार करण्यापर्यंत किमान 16 ते 18 मजुरांची आवश्यकता असते. अनेकांना रोजगारही उपलब्ध होतो. यादरम्यान परगावचे मजुरही रोजगारसाठी येथे येतात. ‘जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो’ उसाचा वरील भाग हा जनावरांना चारा म्हणून उपयोग केला जातो. त्यामुळे ऊस तोडणी साठी परगावचे लोकही येतात. सध्या मोदगा येथे सांबरा, बाळेकुंद्री, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मारिहाळ आदी ठिकाणचे शेतकरी ऊस तोडणीसाठी येत आहेत. त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध होत आहे
‘गुऱ्हाळ व्यवसाय धोक्यात’
सध्या अन्य भागातील गुऱ्हाळ व्यवसायाला घरघर लागली असताना पूर्व भागातील गुऱ्हाळ घरे मात्र, व्यावसायिकानी टिकवून ठेवली आहेत. पूर्वी या भागामध्ये 70 पेक्षा अधिक गुऱ्हाळ घरे होती. आता ही संख्या घटत चालली आहे. यामुळे हा एक चिंतेचा विषय बनला आहे. केवळ आपला पारंपरिक व्यवसाय म्हणून अनेक गुऱ्हाळ व्यावसायिकांनी गुऱ्हाळ घरे चालू ठेवली आहेत. ‘सद्या गुळाला चांगला दर’ येथील रुचकर व चवदार गुळ रविवार पेठ बेळगाव व मार्केट यार्ड येथे दाखल झाले असून, साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल असा गुळाला दर मिळत आहे.