For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जगदीश शेट्टरनाच ‘बेळगाव’मधून संधी

06:33 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
जगदीश शेट्टरनाच ‘बेळगाव’मधून संधी
Advertisement

कारवारमधून विश्वेश्वर हेगडे कागेरी, भाजपची 111 जणांची पाचवी यादी जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर विरोधाला न जुमानता तिकीट मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. तर कारवारचे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांनाही तिकीट गमवावे लागले आहे. संविधान बदलण्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने अनंतकुमार हेगडे यांना तिकीट गमवावे लागले आहे, असे सांगितले जात आहे. याठिकाणी भाजप हायकमांडने माजी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांना तिकीट दिले आहे. रविवारी कर्नाटकसह 8 राज्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना कर्नाटकात तिकीट गमवावे लागले असून तीव्र विरोधानंतरही जगदीश शेट्टर यांना बेळगावचे तिकीट जाहीर झाले आहे. याचबरोबर चिक्कबळ्ळापूर मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. के. सुधाकर  तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. येथील इच्छुक भाजपचे आमदार एस. आर. विश्वनाथ यांचे पुत्र आलोक विश्वनाथ यांना तिकिटापासून वंचित रहावे लागले आहे.

रायचूर लोकसभा मतदारसंघातून राजा अमरेश्वर नायक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रघुचंदन आणि गोविंद कारजोळ यांच्यात चित्रदुर्ग येथील तिकिटासाठी लढत सुरू आहे. मात्र, कारजोळ यांना तिकीट देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. सध्या प्रदेश नेत्यांशी पुन्हा चर्चा करून तिकीट जाहीर करण्याचा निर्णय हायकमांडने घेतला आहे. त्यामुळे चित्रदुर्गाचे तिकीट निश्चित झालेले नाही.

आठ राज्यातील 111 उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी रात्री आपली पाचवी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने देशभरातील आठ राज्यातील लोकसभेच्या 111 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पाचव्या यादीत महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असून सोलापूरमधून राम सातपुते, गडचिरोली-चिमूरमधून अशोक महादेवराव नेते तर भंडारा-गोंदियातून सुनील बाबुराव मेंढे यांना तिकीट प्राप्त झाले आहे. दक्षिण गोव्यातून पल्लवी श्रीनिवास डेम्पो यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

वरुण गांधींचा पत्ता कट, मेनकांचा मतदारसंघ कायम

भाजपने उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधील विद्यमान खासदार वऊण गांधी यांचे तिकीट रद्द करून तेथे जितीन प्रसाद यांना उतरवण्यात आले आहे. मेनका गांधी यांचे नाव यादीत कायम असून त्या सुलतानपूरमधून लढणार आहेत. या यादीत उत्तर प्रदेशातील उर्वरित जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यापूर्वी भाजपने उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 51 जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. भाजपची पाचवी यादी येण्यापूर्वी कानपूरचे विद्यमान खासदार, भाजप नेते सत्यदेव पचौरी यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. पक्षाध्यक्ष जेपी न•ा यांना पाठवलेले पत्र त्यांनी सार्वजनिक केले. त्यात त्यांनी माझ्या उमेदवारीचा विचार करू नये, असे लिहिले आहे.

सिने कलाकारांचीही ‘एन्ट्री’

पक्षाने चित्रपट अभिनेत्री कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवले आहे. त्याशिवाय सुपरहिट टीव्ही कलाकार श्रीराम अऊण गोविल हे देखील निवडणूक लढवणार आहेत. पक्षाने त्यांना मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर कुऊक्षेत्रातून नवीन जिंदाल यांचे तिकीट निश्चित झाले आहे.

नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्राची ‘लॉटरी’

नवीन जिंदाल यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपतर्फे लोकसभा उमेदवारीची ‘लॉटरी’ लागली आहे. नवीन जिंदाल यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या पोस्टमध्ये त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानले आहेत. नवीन जिंदाल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती आणि रविवारी संध्याकाळी राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘मी 10 वर्षे कुऊक्षेत्रातून खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व केले. मी काँग्रेस नेतृत्व आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आभार मानतो. आज मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.