जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभा निवडणुकीची उमेदवारी ??
बेळगाव: दिल्ली दौऱ्यावरून खासदार मंगल अंगडी परतले असून आज पत्रकारांशी त्या बोलत होत्या. उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत देखील आपले नाव वगळण्यात आल्याने आपण दिल्लीला जाऊन पक्ष वरिष्ठांशी भेटल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पत्रकारांनी जर जगदीश शेट्टर यांना पक्षाने तिकिट दिल्यास आपली संमती आहे का ? असे प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या कि, जगदीश शेट्टर हे वरिष्ठ नेते आहेत. पक्षाने त्यांना तिकीट दिल्यास त्यांच्यासाठी आपण प्रचार करू. भाजप राज्याध्यक्षानी देखील जगदीश शेट्टर यांना बेळगावहून लोकसभा निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला आहे असे सांगत जगदीश शेट्टर यांना बेळगाव लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळणार आहे ही बाब स्पष्ट केली. त्या पुढे म्हणाल्या कि, आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट मिळेल अशी आशा होती. मात्र पक्षश्रेष्टींनी यावर निर्णय घेतला आहे. जगदीश शेट्टर यांच्या बेळगाव उमेदवारी संदर्भात गो बॅक अभियाना संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अन्य जिल्ह्याचे नेते वेगवेगळ्या ठिकाणाहून रिंगणात उतरले आहेत. जगदीश शेट्टर हे माजी मुख्यमंत्री असून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात असे त्यांनी सांगितले.