महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इस्कॉनतर्फे आज जगन्नाथ रथयात्रा

10:47 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कृष्णजन्मावर आधारित देखावे

Advertisement

बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे 26 वा जगन्नाथ रथयात्रा महोत्सव 10 व 11 रोजी साजरा करण्यात येणार आहे. शनिवार दि. 10 रोजी दुपारी 1.30 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून रथयात्रेला सुरुवात होणार आहे. दरम्यान संभाजी चौक, कॉलेज रोड, शनिवार खुट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर रोड, एसपीएम रोड, खडेबाजार-शहापूर, नाथ पै सर्कल, गोवावेसमार्गे रथयात्रा शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात सांगता होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही भव्य रथोत्सव यात्रा काढली जाणार आहे. देशामध्ये इस्कॉनतर्फे होणाऱ्या रथयात्रांमध्ये बेळगावची रथयात्रा ही भव्यदिव्य असते. पारंपरिक पद्धतीने सजविलेल्या बैलगाड्या, कृष्णजन्मावर आधारित देखावे रथयात्रेमध्ये सहभागी असतात. रथाची दोरी धरण्यासाठी बेळगावसह आसपासच्या परिसरातून हजारो भाविक सहभागी होतात. शनिवारी रथयात्रा होणार असून रविवारी विविध व्याख्याने, त्याचबरोबर इतर कार्यक्रम होणार आहेत. रथयात्रेसाठी इस्कॉनतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article