कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News : सांगलीत जॅकवेल वीजपुरवठा खंडित; बुधवारी अपुरा पाणीपुरवठा राहणार

03:52 PM Dec 10, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                               सांगलीकरांना पाण्याचा तुटवडा जाणवणार

Advertisement

सांगली : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील जॅकवेल पंप हाऊसचा वीज पुरवठा दीर्घ काळासाठी खंडित झाल्यामुळे बुधवारी दहा रोजी सांगलीत अपुरा पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

Advertisement

या अनपेक्षित व तांत्रिक कारणामुळेबुधवार १० रोजी शहरात अपुरा पाणीपुरवठा जॅकवेल येथील पाणी उपसा व जलशुद्धीकरण प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण होऊ शकली नाही, परिणामी शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे आवश्यक पाणी उपसा करता आला नाही. शुद्धीकरण व साठवण प्रक्रिया बाधित झाली त्यामुळे बुधवार १० रोजी सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा अपुरा अथवा कमी दाबाने होण्याची दाट शक्यता आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी दिली आहे.

प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही करण्यात आली असून वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पंपिंग प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू केली आहे पाणी साठवण आणि वितरण व्यवस्था शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत गुरुवार ११ पासून पाणीपुरवठा नियमित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#MunicipalCorporation#PowerOutage#sangli#SangliCity#WaterAlertbreakingnewsPublicNoticeSangli water supply issuewatersupply
Next Article