इंग्लंड संघात जॅक्सचा समावेश
06:23 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
Advertisement
अॅशेस मालिकेतील येथे गुरूवारपासून खेळविल्या जाणाऱ्या दिवसरात्रीच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात केवळ एक बदल करण्यात आला आहे. इंग्लंड संघामध्ये विल जॅक्सचा समावेश करण्यात आला आहे.
विल जॅक्सने 3 वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले होते. त्यानंतर त्याला इंग्लंड संघात स्थान मिळू शकले नाही. इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीने जायबंदी झाल्याने जॅक्सला संधी देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा पाठदुखापतीमुळे ब्रिस्बेनच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही.
Advertisement
इंग्लंड संघ: क्रॉले, डकेट, पॉप, रुट, ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, जॅक्स, अॅटकिनसन, कार्से आणि आर्चर.
Advertisement