महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जे. पी. नड्डा आता राज्यसभेचे नेते

06:34 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मोठी जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांना राज्यसभेत सभागृह नेते बनवण्यात आले आहे. चार वर्षांहून अधिक काळ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेतृत्व केल्यानंतर जे. पी. नड्डा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्रीय मंत्रिमंडळात परतल्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पीयूष गोयल यांच्या जागी आता नड्डा यांना राज्यसभेत सभागृह नेते बनवण्यात आले आहे. नड्डा हे गुजरातचे राज्यसभेचे खासदार आहेत.

पॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताच नड्डा हे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हिमाचल प्रदेशचे एकमेव प्रतिनिधी बनले. त्यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 9 नोव्हेंबर 2014 ते 30 मे 2019 या काळात मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article