For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जे.कृष्णमूर्तींचं शैक्षणिक चिंतन

06:39 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
जे कृष्णमूर्तींचं शैक्षणिक चिंतन
Advertisement

जे. कृष्णमूर्ती हे जागतिक कीर्तीचे भारतीय तत्वज्ञ. त्यांचा जन्म 11 मे 1895 रोजी तामिळनाडूतील मदनपल्ली गावी झाला. नारायण अय्या आणि संजिवाम्मा हे त्यांचे माता-पिता. दहा मुलांमध्ये त्यांचा क्रमांक आठवा. म्हणून त्यांचे नाव कृष्णमूर्ती. जिद्द हे त्यांचे आडनाव.

Advertisement

कृष्णमूर्ती आणि त्यांचे धाकटे बंधू नित्यानंद यांचा डॉ. अॅनी बेझंट यांनी लहानपणापासून सांभाळ केला. इंग्लंडमध्ये त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. 17 फेब्रुवारी 1986 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. स्वतंत्र विचार हे त्यांच्या प्रवचनांचे वैशिष्ट्या होतं. आपल्या मुक्तीचा मार्ग आपणच नव्याने शोधायचा असतो. कोणताही धर्म किंवा गुऊ आपल्याला सत्यापर्यंत नेऊ शकत नाही असं ते  प्रतिपादन करत. मनुष्याच्या मूलभूत जाणिवांमध्ये बदल व्हायला हवा असं ते सांगत. त्यासाठी त्यांनी जगभर प्रवास केला. मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली.  शाळाही सुऊ केल्या. त्यांच्या शाळांची संख्या खूप नाही. त्यांच्या कल्पनेतल्या शाळा सर्वत्र सुऊ करणे कठीणही आहे. पण त्यांची शिक्षणाकडे बघण्याची दृष्टी निश्चितच मौलिक आणि मूलभूत आहे.

शाळा आणि तुऊंग या जगातील दोनच अशा जागा आहेत, तिथे कुणीच स्वत:हून जात नाही. तेथे दाखल व्हावे लागते, हे शिक्षण व्यवस्थेसंबंधी त्यांचे विधान विलक्षण धक्कादायक आणि विचार करायला लावणारे आहे. त्यांचे शिक्षणविषयक विचार समजून घेणे शिक्षण व्यवस्थेत असलेल्या प्रत्येकाला आवश्यक आहे. भले तशा शाळा सुऊ करता आल्या नाही तरी हरकत नाही.

Advertisement

केवळ शालेय पाठ्यापुस्तकं वाचणे आणि पाठ कऊन लक्षात ठेवणे म्हणजे शिक्षण नसून पुस्तके काय सांगतात ते पहायला ऐकायला शिकणे, पुस्तकं सांगतात ते खरं की खोटं हे तपासून ठरवणं हे ही शिक्षणच. परिक्षेत घवघवीत यश मिळवत पदव्या संपादन कऊन नोकरी मिळवणं आणि लग्न संसारात गुरफटून जाणं याला शिक्षण म्हणता येणार नाही. पक्षांची किलबिलाट, संगीत ऐकता येणं, झाडांचं सौदर्य निखरता येणं, निळंभोर आकाश न्याहाळतां येणं हे सारं शिक्षणच आहे. किंबहुना या साऱ्यांशी जवळीक साधता येणं हे शिक्षण. आंध्र प्रदेशमधल्या ऋषीवॅली शाळेत त्यांच्या शिक्षणचिंतनाचं प्रतिबिंब दिसतं. तिथल्या विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी त्यांनी केलेला संवाद शिक्षण क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शक आहे.

गणित, इतिहास, भूगोल ही विषयांची माहिती शिक्षकाकडून विद्यार्थ्यांपर्यत प्रेषित होणं म्हणजे शिक्षण नसून त्यामुळे मनात परिवर्तन व्हायला हवं. त्यासाठी मुलांमध्ये असामान्य चिकित्सक वृत्ती विकसित व्हायला हवी. जोपर्यंत आपण स्वत: बघत नाही. स्वानुभव घेत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट स्वीकारू नका असं ते मुलांना सांगत. पुस्तकांवर पूर्णपणे विसंबून न राहता स्वत: स्वत:कडून शिकायला हवं.

भीती हा शिक्षणातला एक मोठा अडसर आहे, अशी कृष्णमूर्तींची धारणा होती. भीतीमुळे मन फुलत नाही, बहरत नाही, विकसित होत नाही. शिकण्यासाठी भयमुक्त, मोकळं वातावरण हवं. मनातील भीती दूर करणं हे शिक्षणाचं मुख्य काम आहे. भयमुक्त आणि स्पर्धामुक्त वातावरण खरं शिक्षण होतं. सतत दडपण, स्पर्धा असेल तर शिकणं कठीण होतं. पूर्णपणे भयमुक्त कसं व्हायचं, असा प्रश्न एकदा एका विद्यार्थ्याने कृष्णमूर्तींना विचारला. त्यावर त्यांनी सहज आणि सोपं उत्तर दिलं. ते म्हणाले, कोणी आपल्या बायकोला, नवऱ्याला, आई वडिलांना घाबरतो का? नाही. कारण त्यांना आपण ओळखतो. ज्याबद्दल आपल्याला सर्व माहीत आहे त्याची भीती वाटत नाही. ज्याची भीती वाटते त्याची माहिती कऊन घ्या, समजून घ्या, ओळखा म्हणजे झालं.

बुद्धी (घ्हात्त्ग्gाहम) आणि ज्ञान (ख्हदैत्)ा यांमध्ये मेळ, सुसंवाद हवा, असं कृष्णमूर्तींना वाटतं. बुद्धी ज्ञानाचा उपयोग करते. बुद्धी म्हणजे स्पष्ट, विवेकी, वस्तुनिष्ठ, निरोगी, समजूतदार विचार करण्याची क्षमता. ही क्षमता त्यांना खूप महत्वपूर्ण वाटते. याच्या जोडीलाच संवेदनशीलता ही महत्त्वाची. ज्ञानाला अशा बुद्धीची जोड नसेल तर फक्त ज्ञान धोकादायक विध्वंसक बनू शकतं. आज जगात याची उदाहरणे रोज पहायला मिळतात. ज्ञान असून चालत नाही. ते केव्हा, कुठे, कशासाठी आणि कसे वापरायचे याचा विवेकही हवा. केवळ माहिती, ज्ञान मुलांमध्ये कोंबणं हे शिक्षकाचं काम नसून ही विवेकनिष्ठ, वस्तुनिष्ठ, उपयोगी बुद्धी जागवणं हे मुख्य दायित्व आहे.

ज्ञान किंवा माहिती मिळवणं आणि शिकणं वेगळं आहे हे स्पष्ट करण्यासाठी ते सांगतात. रोबोट किंवा संगणक माहिती मिळवतात. कारण त्यांचे तसं प्रोग्रामिंग झालेलं असतं. त्यानुसार माहिती संकलित केली जाते आणि आवश्यकतेनुसार, मागणीनुसार दिली जाते. पण शिकणं हे माहिती गोळा करणं आणि गरजेनुसार देण्याच्या पलीकडे आहे. माहिती मिळवणे हे यांत्रिक आहे तर शिकण्याने मन ताजं, तऊण आणि तरल बनतं, जेव्हा मन ताजं, टवटवीत तेव्हाच शिकणं होतं. मला माहीत आहे, मी जाणतो, मला कळलं, असं वाटणारं मन शिकू शकत नाही.

माणसाला प्रश्न पडले पाहिजेत. त्याने प्रश्न विचारले पाहिजेत. कोणतरी अधिकार वाणीने सांगतो म्हणून मुकाट्याने ऐकणे, स्विकारणे चूक आहे असं ते सांगत. विद्यार्थ्यांनी भरपूर प्रश्न विचारायला हवेत असा त्यांचा आग्रह होता.

सामान्यपणे पदवी मिळाली की शिक्षण घेणं संपलं अशीच बहुसंख्य लोकांची समजूत असते. शिक्षण ही निरंतर जीवनभर चालणारी प्रक्रिया असं अनेक शिक्षणतज्ञ, तत्वज्ञ, विचारवंत सातत्याने सांगत आले आहेत. जे. कृष्णमूर्तीही शिक्षणाला अंत नाही, शेवट नाही असंच मानतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत शिक्षण अखंडपणे चाललेलं असतं. फक्त पुस्तकं वाचणं, परीक्षा उत्तीर्ण होणं म्हणजे शिक्षण नाही. जीवनाला एक असाधारण अर्थ आहे. तो समजून घ्यायला हवा.

जे आवडतं ते करायला मिळतं ही कठीण गोष्ट आहे. खरं तर शिक्षणात हे व्हायला हवं. वडील वकील अथवा डॉक्टर आहेत म्हणून मुलाने वकील किंवा  डॉक्टर होणं. भले आवडीचं क्षेत्र वेगळंच असूनही अर्थप्राप्ती चांगली होईल म्हणून वकील, डॉक्टर होणं ठीक होईल का? आपल्याला नेमकं काय आवडतं हेच खूप वेळा समजत नाही, कळत नाही आणि त्यातून गडबड होते. ओक वृक्षाच्या बी मधून पाईन वृक्ष ऊजणार नाही, असा सुरेख दाखला ते देतात. स्पर्धात्मक वातावरण शिक्षणाला पोषक नसून मारकच आहे असं त्यांना वाटतं. तंत्रज्ञानाच्या वापरातून संपन्न, मोठा समाज कदाचित घडू शकेल, पण चांगला समाज निर्माण होणार नाही याचे कृष्णमूर्ती स्मरण कऊन देतात. स्वातंत्र्य हवं. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे ते आवर्जून सांगतात.

विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं नातं, संबंध यावर बरंच अवलंबून आहे. ते कम्यूनियम (सरण्यसंबंध) असा शब्द वापरतात. त्या शब्दावर खूप भर देतात. असा संबंध प्रस्थापित झाला तरच प्रभावी अध्ययन अध्यापन घडूं शकतं असा त्यांचा विश्वास आहे.

अवधान (Attाहूग्दह) आणि एकाग्रता (ण्दहमहूग्दह) यापैकी अवधानावर त्यांचा अधिक भर दिसतो. साक्षरतेचे प्रमाण किती वाढलं यापेक्षा समाजात समजूतदारपणा आणि संवेदनशीलतेची पातळी किती वाढली यावर शिक्षणाचं यशोपयश अवलंबून आहे, असं ते म्हणायचे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांनीच त्यांचा शिक्षण विषयक विचारांचा अभ्यास करायला हवा.

-दिलिप वसंत बेतकेकर

Advertisement
Tags :

.