‘एक्स’ची ब्लू टिक घेणे आणखी स्वस्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ने भारतातील आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने आपल्या प्रीमियम सब्सक्रिप्शनच्या प्लॅनच्या किंमतीत 47 टक्क्यांची मोठी घट केली आहे. हा बदल एक्सच्या तीन बेसिक, प्रीमियम आणि प्रीमियम प्लस वर लागू होणार आहे.
यामुळे आता ग्राहकांना बेसिक प्लॅन हा फक्त 170 रुपये प्रति महिना मिळणार, जो प्लॅन 470 रुपये आणि प्रीमियम प्लस प्लॅन 3000 रुपये प्रति महिना उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. कंपनीचा हा मोठा निर्णय भारतासारख्या मोठ्या प्रमाणात इंटरनेट बाजारात एक्सची सेवा पोहोचवणे आणि वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणार असल्याचेही सांगिलते जात आहे.
इलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया कंपनीने ही घोषणा केली आहे, जेव्हा त्यांची दुसरी कंपनी एक्स एआय ने ही आपली नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेस मॉडेल ग्रोक 4 लॉन्च केली आहे. मार्च 2025 मध्ये एक्स एआय आणि एक्स यांच्यात व्यवहार झाल्याची माहिती आहे.