आयटेलचा किंग सिग्नल फोन भारतीय बाजारात लाँच
नेटवर्कसोबत 62 टक्के वेगाने कनेक्टिव्हिटी
वृत्तसंस्था/ मुंबई
चीनी मोबाईल उत्पादक कंपनी आयटेलने 3 एप्रिल रोजी आपला फीचर फोन ‘किंग सिग्नल’ लाँच केला आहे. हा फोन विशेषत: दुर्गम भागांसाठी डिझाइन केलेला आहे. यात सिग्नल बूस्टर तंत्रज्ञान आहे जे 62 टक्के जलद नेटवर्क कनेक्टिव्हिटी देणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यासोबतच, या फोनमध्ये 33 दिवसांची स्टँडबाय बॅटरी आहे. या फोनमध्ये ट्रिपल सिम सपोर्ट, ऑटो कॉल रेकॉर्डिंग आणि -40 अंश सी ते 70 अंश सी पर्यंत तापमान प्रतिरोधकता अशी वैशिष्ट्यो देखील आहेत. भारतीय बाजारात त्याची किंमत 1,399 रुपये आहे. हा फोन 13 महिन्यांची वॉरंटी आणि 111 दिवसांची मोफत रिप्लेसमेंट गॅरंटीसह लाँच करण्यात आला आहे.
दुर्गम भागात मजबूत नेटवर्क
आयटेलचा किंग सिग्नल फोन कमकुवत नेटवर्क असलेल्या भागांसाठी डिझाइन केलेला आहे. तो सिग्नल बूस्टर तंत्रज्ञानाचा वापर करतो. कंपनीचा दावा आहे की हा फोन इतर ब्रँडपेक्षा 62 टक्के जलद कनेक्टिव्हिटी देतो आणि कमी सिग्नलमध्येही 510 टक्के अधिकचा जास्त कॉल कालावधी देतो.