आयटेल एआय फिचर्सचा फोन 2100 रुपयांमध्ये लाँच
2000 एमएएच क्षमतेच्या बॅटरीसह सुपर गुरु 4 जी मॅक्स
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
आयटेलने 23 जुलै रोजी सुपर गुरु 4जी मॅक्स फीचर फोन लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की हा भारतातील पहिला एआय फीचर फोन आहे. या फोनमध्ये 3 इंचांची क्रीन, एआय व्हॉइस असिस्टंट आणि 2000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. त्याची किंमत 2099 रुपये आहे. हा फोन हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्हॉइस कमांड समजतो आणि 13 भारतीय भाषांना सपोर्ट करतो. त्याचा व्हॉइस असिस्टंट कॉल करणे, अलार्म सेट करणे, संदेश पाठवणे आणि वाचणे, कॅमेरा उघडणे, संगीत किंवा व्हिडिओ प्ले करणे आणि रेडिओ चालू करणे सोपे करतो.
फोनची वैशिष्ट्यो
या फोनमध्ये 2000 एमएएच बॅटरी आहे जी 22 तासांचा टॉकटाइम आणि 30 दिवसांचा स्टँडबाय टाइम देते. तो टाइप-सी चार्जरने चार्ज करता येतो. यामध्ये ड्युअल 4 जी सिम स्लॉट, व्हीजीक कॅमेरा, ब्लूटूथ आणि 2000 कॉन्टॅक्ट स्टोरेज आहे. 64 जीबी पर्यंत एक्सपांडेबल मेमरी आणि वायरलेस एफएम रेडिओ देखील आहे. हा फोन काळ्या, शॅम्पेन गोल्ड आणि निळ्या रंगांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमध्ये 2099 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोन 13 भाषांना सपोर्ट करतो.