आयटेलचा ए90 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर
एआयसह अन्य वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन भेटीला
नवी दिल्ली :
टेक कंपनी आयटेलने भारतीय बाजारात एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन ए90 सादर केला आहे. कंपनीचा दावा आहे की हा एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये एआय फीचर असलेला सर्वात स्वस्त फोन आहे.
स्मार्ट असिस्टंट कागदपत्रांची उत्तरे देणे, गॅलरीमधून प्रतिमांचे वर्णन करणे, व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल करणे अशा अनेक वैशिष्ट्यांसह हा फोन येतो. याशिवाय, यात 5000 एमएएच बॅटरीसह 6.6-इंच एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले याला आहे.
आयटेलने हा स्मार्टफोन 6,499 रुपयांसह दोन प्रकारांमध्ये सादर केला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 6499 रुपये आहे. हा फोन भारतातील सर्व रिटेल स्टोअरमध्ये स्टारलाईट ब्लॅक, स्पेस टायटॅनियम, ऑरोरा ब्लू आणि कॉस्मिक ग्रीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
लाँच ऑफर अंतर्गत आयटेल ए90 खरेदी केल्यावर वापरकर्त्यांना 100 दिवसांच्या आत मोफत क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. याशिवाय, तुम्हाला जिओसेव्हन प्रोचे 3 महिन्यांचे मोफत सबक्रिप्शन देखील मिळणार असल्याची माहिती आहे.