इटलीचा सिनर पुन्हा अग्रस्थानी
वृत्तसंस्था / पॅरिस
नुकत्याच येथे झालेल्या एटीपी टूरवरील पॅरिस मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनरने कॅनडाच्या अॅलीसिमेचा अंतिम सामन्यात पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या जेतेपदामुळे सिनरने एटीपी ताज्या मानांकनात पुन्हा अग्रस्थानावर झेप घेताना स्पेनच्या अल्कारेझला खाली खेचले.
अंतिम सामन्यात सिनरने अॅलिसीमेचा 6-4, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले. या जेतेपदामुळे इटलीच्या सिनरने एटीपी मानांकनात स्पेनच्या अल्कारेझला पहिल्या स्थानावरुन खाली खेचत अग्रस्थानावर झेप घेतली आहे. सिनरने अलिकडच्या कालावधीत इनडोअर टेनिस स्पर्धेत सलग 26 सामने जिंकत आपली विजय घौडदौड कायम राखली आहे. आता इटलीतील ट्युरीनमध्ये होणाऱ्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत अॅलिसीमेला पहिल्या आठ क्रमवारीतील टेनिसपटूंमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. चालु वर्षीच्या टेनिस हंगामातील सिनरचे हे पाचवे विजेतेपद आहे.