महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इटली क्रोएशियाला बरोबरीत रोखून पुढील फेरीत

06:32 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लीपझिग (जर्मनी)

Advertisement

बदली खेळाडू मॅटिया झॅकग्नीने स्टॉपेज टाइमच्या शेवटच्या मिनिटात गोल करून इटलीचा क्रोएशियाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत सोडेवला. त्यासरशी त्यांनी युरोपियन चॅम्पियनशिपच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. लुका मॉड्रिचच्या दुसऱ्या सत्रातील गोलानंतर क्रोएशिय ‘ब’ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ ठरेल असे वाटत होते. परंतु झॅकग्नीने अतिरिक्त वेळेच्या आठव्या मिनिटाला अप्रतिम फटका हाणून गोल नोंदवला.

Advertisement

क्रोएशियाचे प्रशिक्षक झ्लात्को डॅलिच या निकालामुळे स्वाभाविकपणे नाखूष दिसले. इटलीला प्रगतीसाठी एका गुणाची गरज होती, तर क्रोएशियाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विजयाची गरज होती. क्रोएशियाचे तीन सामन्यांतून दोन गुण आहेत आणि ते सर्वोत्तम तृतीय क्रमांकधारक ठरू शकतील की नाही हे इतर निकालांवर अवलंबून होते.

बर्लिनच्या ऑलिम्पिया स्टेडियममध्ये शनिवारी उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीचा सामना स्वित्झर्लंडशी होईल. याच ठिकाणी अंतिम सामना 14 जुलै रोजी होईल. इटलीचा गोलरक्षक जियानलुइगी डोनाऊम्माने पेनल्टी निष्फळ ठरविल्यानंतर मॉड्रिचने 33 सेकंदांत गोल केला. तो या स्पर्धेतील वयाने सर्वांत ज्येष्ठ गोल करणारा खेळाडू ठरला आहे. मॉड्रिच 38 वर्षे, 289 दिवस वयाचा असून त्याने इविका व्हॅस्टिकचा विक्रम मोडला आहे, ज्याने 38 वर्षे, 257 दिवस वयावर गोल केला होता. व्हॅस्टिकने युरो, 2008 मध्ये पोलंडविऊद्ध ऑस्ट्रियाकडून गोल केला होता.

मॉड्रिचची पेनल्टी चुकल्यानंतर क्रोएशियाने लगेच पुन्हा आक्रमण केले आणि अँटे बुदिमिरने मारलेला फटका डोनाऊम्माने रोखला. परत आलेल्या चेंडूवर ताबा मिळवत 55 व्या मिनिटाला मॉड्रिचने इटलीला झटका दिला. क्रोएशियन चाहत्यांचा आनंद त्यामुळे गगनात मावेनासा झाला होता यामुळे इटालियन्सना अचानक गोलची गरज भासू लागली. कारण पराभव पत्करावा लागल्यास त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागले असते.इटलीने आपला दबाव कायम ठेवला आणि अखेरच्या क्षणी त्याचे फळ त्यांना मिळाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article