एक फोटो काढण्यासाठी लागली 7 वर्षे
छायाचित्र पाहून नासा देखील थक्क
योग्य अँगलने एकदम अचूक क्षण टिपण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये तंत्रज्ञानाची चांगली समज असायला लागते. यात अनेकदा परफेक्शनसाठी 15-20 मिनिटे किंवा एक तासाचाही वेळ लागू शकतो. परंतु कुणी छायाचित्र योग्यप्रकारे काढण्यासाठी 7 वर्षे घेतल्यास काय होईल? इटलीतील शहर ट्यूरिनमध्ये वेलेरियो मिनाटो नावाच्या एका छायाचित्रकाराने असेच काहीसे केले आहे. एक दुर्मिळ आणि आश्चर्यजनक छायाचित्र काढण्याची आणि या छायाचित्राला पूर्ण जगाने ‘फोटोग्राफ ऑफ द डिकेड’ म्हणून आठवणीत ठेवावे अशी त्यांची इच्छा होती. याकरता ते एका अशा शोधावर निघाले, ज्यात 6 वर्षांचे धैर्य आणि अचूक योजना तयार करावी लागली. मिनाटो यांनी आकॉनिक लँडमार्क्ससोबत पूर्णपणे अलाइंड चंद्राचे छायाचित्र काढले आहे. छायाचित्राात बेसिलिका ऑफ सुपरगाचा गुबंद अणि विशाल मोनविसो पर्वतामागे चंद्र दिसून येतो. हे छायाचित्र अत्यंत सुंदर आणि अनोखे असल्याने अंतराळ संस्था नासाने देखील छायाचित्रकाराचा गौरव केला आहे.
2017 पासून मिनाटो यांनी चंद्राचे हे छायाचित्र टिपण्यासाठी जटिल प्रक्रिया समजून घेण्याकरता प्रचंड मेहनत केली होती. त्यांनी चंद्राच्या अनेक कला, हॉरिजनच्या आर-पार, त्याचा मार्ग आणि हवामानाचाही अभ्यास केला होता. ट्यूरिनच्या आकाशात कायम ढग दाटलेले असल्याने त्यांना अनेकदा निराश व्हावे लागले होते मी प्रथम ट्यूरिनमध्ये मग आसपासच्या क्षेत्रात, शहराला विविध पॉइंट्स आणि अंतरावरून पाहण्यासाठी 2012 पासून शूटिंग करत आहे. एका निश्चित बिंदूवर मी सुपरगा आणि मोनविसोच्या गुबंदाला पूर्णपणे अलाइन करण्याच्या पॉइंटचा शोध सुरू केला. 15 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता तो क्षण आला, आकाश निरभ्र झाले आणि चंद्र ज्या स्थितीत हवा होता त्याच स्थितीत पोहोचला. कॅमेरा तयार ठेवत त्या क्षणाला कॅमेऱ्यात कैद केल्याचे मिनाटो यांनी सांगितले आहे.