महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शुक्रवारी पावसाने झोडपले

12:05 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भातमळण्या पावसात सापडल्याने शेतकरी पुन्हा संकटात : मोठे नुकसान

Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

बेळगाव व खानापूर तालुक्याच्या काही भागामध्ये शुक्रवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास पावसाने झोडपले. त्यामुळे भातमळण्या पावसात सापडल्या असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी दुपारपासूनच बेळगाव तालुक्याच्या पूर्वभागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशातच सायंकाळी 7.30 च्या सुमारास वारा व विजांच्या गडगडाटांसह पावसाला प्रारंभ झाला. हा पाऊस बसवण कुडची, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, बसरीकट्टी, होनिहाळ, मोदगा, मारीहाळ, कणबर्गी, कलखांब, मुचंडी आदी गावांमध्ये झाल्याने भातमळण्या मोठ्या प्रमाणावर सापडल्या आहेत. कापलेले भातपीकही पावसात सापडले आहे. यंदा पावसाअभावी भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उरलीसुरली भातपिके पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू होती. अशातच शुक्रवारी झालेल्या पावसाने भातपिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे 15 ते 20 मिनिटे या भागात पाऊस झाला आहे.

ऊसतोडणी ठप्प होणार

दिवाळीनंतर या परिसरातील शेतकऱ्यांनी ऊसतोडणीच्या कामालाही प्रारंभ केला होता. ऊस तोडणीसाठी परगावच्या मजुरांच्या टोळ्या शेतवडीत दाखल झाल्या आहेत. परंतु शुक्रवारी झालेल्या पावसामुळे मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. शेतवडीत ओलावा निर्माण झाल्यामुळे सध्या ट्रॅक्टर, ट्रक यासारखी वाहने जाऊ शकत नसल्यामुळे ऊसतोडणीही ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खानापूर तालुक्यात पाऊस

खानापूर तालुक्यात शुक्रवारी रात्री पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भातकापणी सुरू केली आहे. तसेच भाताची मळणीची कामेही जोरदार सुरू झाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची भाताची कापणी लगबगीने आटोपून घेण्याचीच धांदल सुरू होती. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने  शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सायंकाळी 6 पासूनच हलक्या सरी पडत होत्या. रात्री 8 वाजता खानापूर, हलशी, हलगा, नंदगड, चापगावसह जांबोटी भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. यावर्षी पाऊस नसल्याने भातपीक म्हणावे तसे आले नव्हते. मात्र आलेले भात कापून घरी आणण्याच्या प्रयत्नात शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून होता. एकाचवेळी सगळीकडे भातकापणी आणि मळणी सुरू झाली. या पावसामुळे पाणथळ जमिनीतील कापलेले भात वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्यातील शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. यावर्षी संपूर्णपणे पावसाने पाठ फिरवली होती. अशातच रानटी जनावरांनी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान केले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांनी भातकापणी थांबवली होती. गेल्या आठवड्यापासून तालुक्यात भातकापणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती, पण आज झालेल्या पावसाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article