महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शनिवारी पावसाने पुन्हा झोडपले

06:27 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सकाळी दमदार तर दिवसभर पावसाची रिपरिप

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शनिवारी शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले. सकाळी सर्वत्र दमदार पाऊस कोसळला. तर दुपारी अधूनमधून दमदार सरीबरोबरच पावसाची रिपरिप सुरू होती. या दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. जोरदार पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. तर काही गटारींचे पाणी रस्त्यावर आले होते. यामुळे पादचाऱ्यांना व दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागला.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मध्यंतरी कडकडीत ऊन पडले होते. त्यानंतर ढगांचा गडगडाट होऊन पाऊस कोसळला होता. मात्र शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा शिडकावा होत होता. शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासून 10 पर्यंत दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वच पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शनिवारी बाजारचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील जनतेने शहराकडे येण्याचा बेत आखला होता. मात्र दमदार पावसामुळे शहराकडे पाठ फिरवली. या पावसामुळे शहरातील फेरीवाले, बैठे व्यापारी व इतर व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती. श्रावण महिना असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असते. मात्र पावसामुळे म्हणावी तशी गर्दी दिसून आली नाही. दमदार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणीच पाणी झाले होते. अनेक रस्त्यांवरही पाणी बराचवेळ साचून होते.

गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बराच बदल झाला होता. गारवा जाणवत होता. याचबरोबर शुक्रवारी जोरदार वाराही येत होता. शनिवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला. शिवारात या पावसामुळे पुन्हा पाणी साचून राहिले. त्यामुळे पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article