महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रप्रतिकांचा आम्ही नव्हे, भाजपच अवमान करतेय!

12:06 PM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा आरोप

Advertisement

पणजी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे पत्रकार परिषदांमधून काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. काँग्रेसचे दक्षिणेचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाचा अवमान केला, असे भाजप सांगत आहे. परंतु खुद्द सदानंद शेट तानावडे यांनी भारतीय तिरंग ध्वज एका कार्यक्रमात उलटा धरून अवमान केलेला आहे, हे विसरू नये, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे तत्कालीन राज्यपाल बाजूभाई वाला यांनी राष्ट्रगीत सुरू असतानाच देशाचा अवमान केला, रशियाच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना त्यावेळी भारताचे राष्ट्रगीत सुरू असतानाच पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रगीतासाठी उभे न राहता पुढे चालतच राहिले, असेही ते म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी काल बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर आरोप करताना विरियातो फर्नांडिस यांनी सेंट जासिंतो बेट या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करू दिले नाही, असे सांगितले. या व्यक्तव्यावरून पाटकर यांनी पुरावे सादर केले. काँग्रेसच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अमित पाटकर यांच्यासमवेत उपाध्यक्ष तुलियो डिसोझा, सुनील कवठणकर उपस्थित होते. पाटकर म्हणाले, कॅप्टन विरियातो यांना लायकी नसलेला उमेदवार म्हणून त्यांनी जी भाषा केली ती अयोग्य नाही. जर सदानंद शेट तानावडे यांना लायकी असेल तर त्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे. भाजपने जनतेला दिलेली आश्वासने किती पूर्ण केली या सर्वांची उत्तरे द्यावी. लोकांच्या आग्रहाखातर 14 ऑगस्ट रोजीच सेंट जासिंतो बेटावर ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका विरियातो यांनी बजावली होती. याबाबतच्या बातम्या 15 ऑगस्ट रोजीच्या राज्यातील दैनिकांत प्रसिद्ध झाल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

तानावडे यांच्या विरोधात तक्रार करणार

कॅप्टन विरयातो फर्नांडिस यांचा चुकीचा व्हिडियो व्हायरल करून तानावडे यांनी राज्यातील जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल दिली आहे. त्यांच्याविऊद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याचा इशारा अमित पाटकर यांनी दिला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article