For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखणे आवश्यक

10:43 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखणे आवश्यक
Advertisement

उदयसिंग रजपूत: बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा स्थापना दिवस साजरा

Advertisement

बेळगाव : शिक्षक हा अंतर्गत आणि बाह्य दृष्टिकोनातून परिपक्व असला पाहिजे, संस्कार, संस्कृती आणि परंपरा याबाबत जाणिव ठेऊन अध्यापन केले पाहिजेत. विद्यार्थ्यांतील कलागुण ओळखून त्या दृष्टिकोनातून कौशल्य विकसित केले पाहिजे. त्याबरोबर ज्या संस्थापकांनी संस्था स्थापन केली. त्यांच्या विचारांचे स्मरण आणि पालन केले पाहिजे, असे उद्गार आर. एल. पीयु कॉलेजचे माजी प्राचार्य उदयसिंग रजपूत यांनी काढले. बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम एम. व्ही. हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात झाला. व्यासपीठावर उपाध्यक्ष  दिलीप चिटणीस, डॉ. अजित कुलकर्णी, विनायक आजगावकर आदी उपस्थित होते.  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

बदल करून अध्यापन करा

Advertisement

रजपूत म्हणाले, बदलत्या प्रवाहानुसार शिक्षकांनी बदल करून अध्यापन केले पाहिजे. विद्यार्थ्यांशी आपुलकीने सहवास वाढविला पाहिजे, त्यांना मनोरंजनात्मक शिक्षण देऊन इतर कर्मचाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले पाहिजे.

शिक्षकांनी तळमळीने कार्य करावे

डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले, शिक्षकांनी तळमळीने कार्य केले पाहिजेत. ज्या संस्थेत सेवा करतो त्या ठिकाणी प्रामाणिक सेवा बजावून संस्थेचे हित जपले पाहिजे, असे ते म्हणाले. के. एच. शेख यांनी स्वागत केले. पंकज शिवालकर यांनी परिचय करून दिला. यावेळी मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य मारुती हुंदरे, जे. एन. भंडारी, स्कूल ऑफ आर्टस्चे प्राचार्य सुभाष देसाई व हेरवाडकर स्कूलचे प्राचार्य सुनील कुसाणे यांनी अहवाल सादर केला. यावेळी पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन वर्षा महाजन व शर्मिला देशपांडे यांनी केले. ज्ञानेश कलघटगी यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.