For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवतार चित्रपटातील ‘दिव्य वृक्ष’च जणू

06:11 AM Jan 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अवतार चित्रपटातील ‘दिव्य वृक्ष’च जणू
Advertisement

जपानच्या तोचिगी प्रांतात अशिकागा फ्लॉवर पार्कमध्ये एक मोठा अद्भूत विस्टेरिया वृक्ष आहे. 150 वर्षांपेक्षा अधिक जुना हा वृक्ष जेव्हा पूर्णपणे बहरतो तेव्हा ते दृश्य मनाला थक्क करून टाकणारे असते. याची फुले इतक्या अधिक अंतरापर्यंत लटकत असतात, ती जवळपास जमिनीलाच स्पर्श करत असतात. हे पाहून तुम्हाला हॉलिवूड चित्रपट अवतारमधील दिव्य वृक्ष आठवू लागेल. या विस्टेरिया वृक्षाला उन्मळून पडण्यापासून वाचविण्यासाठी उद्यानात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वृक्षाचे वयोमान आणि त्यावर फुलणाऱ्या अधिक फुलांमुळे त्याच्या फांद्यांना जाळीदार बिम्सद्वारे सहारा देण्यात आला आहे. या वृक्षाला जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हटले जाते. वृक्षाला लटकलेली फुले गुलाबी ढगाप्रमाणे गवताच्या मैदानावर घोंगावत असतात. सोशल मीडियात या वृक्षाची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात या वृक्षाचे सौंदर्य पाहू शकता.

Advertisement

जाळीदार बिम्सवर टिकलेला हा वृक्ष आश्चर्यकारक फुलांची छत्रीच जणू तयार करतो, ज्यात अत्यंत मोठे मनमोहक दृश्य दिसून येते, वृक्षाच्या आश्चर्यजनक दृश्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जगभरात छायाचित्रकार येथे धाव घेत असतात. हा वृक्ष प्रत्यक्ष पाहण्यासाठी इच्छा असल्यास वर्षातील सर्वात उत्तम कालावधी एप्रिल आणि मे मध्यापर्यंतचा असतो. अशिकागा फ्लॉवर पार्कमध्ये 3500 हून अधिक विस्टेरिया वृक्ष लावण्यात आले आहेत. परंतु या प्राचीन वृक्षाची बाबच और आहे. उद्यानातील लाइट्स सुरू केल्यावर तेथील दृश्य हॉलिवुड चित्रपट अवतारच्या ‘कलरफुल जंगल’प्रमाणे दिसते. 2014 मध्ये सीएनएनने अशिकागा फ्लॉवर पार्कची निवड जगातील ड्रीम ट्रॅव्हल डेस्टिनेशन म्हणून केली होती. अशिकागा फ्लॉवर पार्क एक थीम पार्क असून ते 94 हजार चौरस मीटरमध्ये फैलावलेले आहे. तसेच ते तोचिगी प्रांतातील अशिकागा शहरात आहे. दरवर्षी लाखो लोक या पार्कला भेट देत असतात. या पार्कमध्ये आणखी अनेक विस्टेरिया वृक्ष असले तरीही यातील ग्रेट विस्टेरिया वृक्ष लोकांची मने जिंकतो. जपानमध्ये याहून अधिक जुने विस्टेरिया वृक्ष आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.