या ठिकाणी मरणे आहे बेकायदेशीर
कारण जाणून घेतल्यावर बसेल धक्का
जगात अनेक प्रकारचे अजब कायदे आहेत. यातील काही कायदे इतके विचित्र आहेत की ते ऐकल्यावर धक्काच बसतो. जगातील काही ठिकाणे मरणे देखील बेकायदेशीर आहे. या ठिकाणी मृत्यू झाल्यास त्याला गुन्हा मानण्यात येते. या ठिकाणी कुणीच मृत्यू येणे पसंत करत नाहीत.
लोंगयेरब्येन : नॉर्वेतील लोंगयेरब्येन एक असे शहर आहे, जेथे लोकांना मरण्याची अनुमती नाही. जेव्हा एखादा व्यक्ती आजारी पडतो किंवा त्याचा मृत्यू समीप आल्याची जाणीव झाल्यावर त्याला दुसऱ्या शहरात हलविले जाते, जेणेकरून त्याला स्वत:च्या अखेरच्या काळात आरामात जगता यावे.
फाल्सीआनो डेल मैसिको : इटलीच्या फाल्सीआनो डेल मैसिकोमध्ये देखील 2012 मध्ये कायदा लागू करण्यात आला. तत्कालीन महापौर गिउलिओ सिसारे फवा यांनी फाल्सीआाने डेल मैसिकोच्या नगरपालिकेत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि या नगरपालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथे मरणे बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. तेथील दफनभूमी पूर्णपणे भरल्याने हा आदेश जारी करण्यात आला होता. तेथे कुणाला दफन करण्यासाठी जागाच नाही. येथील लोकांच्या मृत्यूनंतर त्यांना नजीकच्या शहरात मोठ्या रकमेच्या खर्चासह दफन केले जात ओ.
फोर्ट बोयार्ड, फ्रान्स : फोर्ट बोयार्ड एक ऐतिहासिक किल्ला असून तो फ्रान्समध्ये आहे. या किल्ल्यात मरणे बेकायदेशीर आहे. या किल्ल्यात राहणाऱ्या लोकांचे आत्मे आजही येथे भटकत असतात असे मानले जाते.
हाँग काँग : हाँग काँगमध्ये काही असे नियम आहेत, जे मृत्यूशी संबंधित आहेत. येथे मृतदेहाला घरात ठेवता येत नाही.
इटलीतील काही शहरं : इटलीच्या काही शहरांमध्ये देखील मृत्यूशी निगडित काही अजब नियम आहेत. येथे मृतदेहाला घराबाहेर काढण्यापूर्वी खास अनुमती घ्यावी लागते.