For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यातील जैवविविधता टिकवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

11:01 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यातील जैवविविधता टिकवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य
Advertisement

आमदार विठ्ठल हलगेकर यांचे प्रतिपादन : वन्यजीव सप्ताहनिमित्त खानापुरात वॉकथॉनचे आयोजन : 7 कि. मी.च्या स्पर्धेत अनेकांचा सहभाग

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यावर निसर्गावर मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या रांगांत प्रचंड वनसंपत्ती निर्माण झालेली आहे. या निसर्गाच्या सानिध्यात आपण वावरत आहोत. निसर्गाचा आनंद आणि अनुभव आम्हाला अनुभवता येतो. हे आमचे भाग्य आहे. यासाठी हा निसर्ग ही जैवविविधता कायम टिकवणे, वाढवणे तिचे संरक्षण करणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे. येणाऱ्या भविष्यात निसर्गाचे महत्त्व अधोरेखीत होणार आहे. यासाठी सर्वांनी निसर्गाचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य आमदार विठ्ठल हलगेकर यांनी वनखात्याच्यावतीने वॉकथॉनच्या समारोपावेळी हेम्माडगा येथे व्यक्त केले.

वन्यजीव सप्ताहनिमित्त खानापूर, लोंढा, नागरगाळी आणि भीमगड अभयारण्य वनखात्याच्यावतीने रविवारी सकाळी 7 वाजता शिरोली ते हेम्माडगा या सात कि. मी. च्या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. शिरोली येथे या वॉकथॉनला आमदार विठ्ठल हलगेकर, सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, डीसीएफ मारीया क्रीस्तु, राजा, डीसीएफ सोशल, गौरव, एसीएफ सुनिता निंबरगी, एसीएफ नागरगाळी, शिवानंद मगदूम, लेंढा आरएफओ तेज. वाय. पी., पर्यावरणवादी प्रवीण भागोजी, भीमगड अभयारण्याचे अधिकारी सय्यद नदाफ, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष आय. आर. घाडी, लायन्स क्लबचे अध्यक्ष सागर उप्पीन यासह अनेक पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमीनी हिरवा झेंडा दाखवून चालना दिली.

Advertisement

सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात भीमगड अभयारण्याच्या जंगलातून शेकडो निसर्गप्रेमी या वॉकथॉनात सहभागी झाले होते. 7 कि. मी. च्या अंतरात  वनखात्याच्यावतीने निसर्गाबाबत तसेच वन्यप्राण्याबाबत जैवविविधतेबाबत जागृती करणारे जागोजागी फलक लावलेले होते. भीमगड अभयारण्यातून निसर्गाचा आनंद लुटत शेकडो निसर्गप्रेमीनी या वॉकथॉनचा आनंद घेतला. बेळगाव, धारवाड तसेच इतर ठिकाणाहून अनेक निसर्गप्रेमी वॉकथॉनमध्ये सहभागी झाले होते. वनखात्यातर्फे सहभागी झालेल्या प्रत्येकाला भीमगड वाईल्ड लाईफच्यावतीने टी शर्ट देण्यात आले.

या वॉकथॉन स्पर्धेत विद्यार्थी, शिरोली ग्रा. पं. व नेरसा ग्रा. पं. चे पदाधिकारी, सदस्य सहभागी होते. हेम्माडगा येथे समारोह कार्यक्रमावेळी वन्यजीवन तसेच पर्यावरण, जंगलाचे महत्त्व याबाबत जागृती करण्यात आली. सहभागी झालेल्यांसाठी वनखात्यातर्फे अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती. वनखात्याच्या या वॉकथॉनच्या नियोजनाबाबत सहभागी झालेल्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होते. शिरोली ग्रा. पं. च्या अध्यक्षा निलम मादार, सदस्य कृष्णा गुरव, दीपक गवाळकर, सुरेश जाधव, विनायक मुतगेकर, नारायण काटगाळकर, लायन्स क्लबचे पदाधिकारी, अजित पाटील, बसवराज हमण्णावर यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.