जाचक नियम आणि अटी लादल्या ने गाय दूधाच्या अनुदानाचा लाभ मिळणे दुरापास्त
शासनाने दुध उत्पादकांच्या तोंडाला पुसली पाने
वारणानगर / प्रतिनिधी
शासनाने गाय दूध उत्पादकांना दिलेले प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाचक नियम अटी लादल्या ने त्यांचा लाभ मिळणे दुरापास्त झाले असून या धोरणाने शासनाने दुध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत यामुळे हे धोरण फसवे वाटू लागले आहे.शासनाने दि. ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी पर्यन्त च्या कालावधीत गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे याचा लाभ संघाला दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रत्यक्ष होणार आहे या योजनेच्या लाभासाठी जाचक, किचकट असे नियम लावल्याने या नियमात दुध उत्पादक शेतकरी पात्र ठरत नाही.
भारत पशुधन पोर्टलवर (एनडीएलएम)प्रथम शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांची नोंद यावर असने गरजेचे आहे सद्या स्थितीत नव्वद टक्यापेक्षा अधिक दूध उत्पादकांची यावर नोंद नाही शासनाने नोंदणीचे काम शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरू केले असून ती यंत्रना तोकडी पडत आहे.
दूध उत्पादकांचे आधार कार्ड बॅक खाते व मोबाईल नंबरचे संलग्नित असने बरोबर तो पशुधन आधार सलग्नित करणे आवश्यक असून असा गाय दूध उत्पादकच या प्रतिलिटर ५ रुपये लाभासाठी पात्र ठरणार असून शासन अनुदानाची रक्कम थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.
जिल्ह्यातील गोकुळ,वारणा या प्रमुख दूध उत्पादक प्रक्रिया संघासह छोट्या दूध संघाच्या मार्फत प्रतिदिन सुमारे १० लाख लिटर गाय दुध खेड्यातील हजारो दूध पुरवठा संस्थेच्या माध्यमातून संकलन केले जाते लाखो शेतकरी हे दूध पुरवठा करतात दुधाळ जनावरे शेतकऱ्यांच्या नावे असते काही जनावरे अर्थसहाय्य घेऊन घेतली जातात प्रत्यक्षात उत्पादीत दूध शेतकरी त्याची आई,पत्नी, मुलगा, सुन यांच्या नावावर दूध पुरवठा संस्थेत दूध घालतात त्यामुळे दुधाळ जनावरांची नोंद दूध घालणाऱ्याच्या नावे असेलच असे नाही निम्यापेक्षा अधिक दूध उत्पादकांची बँक खातीच नाहीत मोबाईल आधार कार्ड सलग्नित नोंदणी मिळणे कठीण आहे त्यामुळे या दूध योजनेचा लाभ दूध उत्पादकांना मिळणे दुरापास्त झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे अनुदान फसवे वाटू लागले आहे.
उत्पादक संघ, पुरवठा संस्थेच्या माध्यमातून दूधाचे अनुदान द्यावे
दूध उत्पादक शेतकरी गावातील दूध पुरवठा संस्थेला दूध घालतो त्या दूध उत्पादकांचे नाव पुरवठा संस्थेत आहे. दूध पुरवठा संस्था दूध संघाना संकलित दूधाचा पुरवठा करते यांच्या नोदी संघाकडे आहेत त्यामुळे शासनाला खरेच प्रतिलिटर ५ रुपये गाय दूधा साठी अनुदान द्यायचे आहे तर ते अनुदान दूध संघ, पुरवठा संस्थेच्या माध्यमातून शासनाने वितरीत केल्यास त्याचा नक्कीच जलद लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल यासाठी शासनाने उत्पादक संघ, पुरवठा संस्थेच्या माध्यमातून दूधाचे अनुदान द्यावे.
शिवाजीराव मोरे
संचालक, वारणा दूध संघ