23 कोटी दिले काय व 20 लाख फरक पडत नाही : व्यंकटेश अय्यर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मी एक व्यावहारिक व्यक्ती आहे. मला माहित आहे की, दबाव आहे आणि माझी कराराची रक्कम आणि अन्य सर्व गोष्टींबद्दल खूप चर्चा आहे. पण ते माझ्या नियंत्रणात नाही. माझ्या नियंत्रणात जे आहे ते म्हणजे संघाला जिंकण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करणे आणि ते मला 23 कोटी ऊपये दिले काय आणि 20 लाख रुपये दिले काय, कायम राहील, असे कोलकाता नाईट रायडर्सचा उपकर्णधार व्यंकटेश अय्यरने त्याच्या आयपीएल प्रवासाबद्दल बोलताना म्हटले आहे.
टी-20 लीगच्या दबावांना तोंड देण्यासाठी सद्यस्थितीचा तेवढा विचार करणे ही गुऊकिल्ली आहे, असे त्याला वाटते. गेल्या हंगामात 370 धावा काढून आयपीएलच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अय्यरला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात केकेआरने तब्बल 23.75 कोटी ऊपयांना परत करारबद्ध केले. ‘आयपीएल खेळताना मी एक गोष्ट शिकलो आहे आणि ती म्हणजे एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रीत करणे म्हणजे वर्तमानात जगणे अत्यंत महत्वाचे आहे. मी हे कठीण पद्धतीने शिकलो आहे आणि ते सोपे वाटत असले, तरी अंगवळणी पाडणे खरोखर कठीण आहे. गेल्या काही वर्षांत मी अशी मानसिकता विकसित केली आहे की, माझ्यासाठी फक्त आजचा क्षण, आजचा सामना आणि आजचा सराव महत्त्वाचा असतो. मी आधी काय झाले आहे किंवा पुढे काय होणार आहे याचा विचार न करण्याचा प्रयत्न करतो, असे अय्यरने म्हटले आहे.
केकेआरचा उपकर्णधार अय्यर आयपीएल, 2025 मध्ये पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरला होता, परंतु सनरायझर्स हैदराबादविऊद्ध 29 चेंडूंत मॅचविनिंग 60 धावांची खेळी करून तो पुन्हा त्याच्या लयीत परतला आहे. ‘एकदा स्पर्धा सुरू झाल्यावर माझे लक्ष फक्त फलंदाजी व गोलंदाजीवरच नव्हे, तर माझ्या नेतृत्वाच्या नवीन भूमिकेवरही असते. थोडक्यात सर्व प्रकारे योगदान देण्यावर माझे लक्ष असते’, असे त्याने म्हटले आहे.