आयटी कंपनी विप्रोला 3330 कोटीचा नफा
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयटी क्षेत्रातील कंपनी विप्रोने पहिल्या तिमाहीतील नफा जाहीर केला असून नफ्यामध्ये 10 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. जून 2025 संपलेल्या पहिल्या तिमाहीत विप्रो कंपनीने 3330 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. याच्या मागच्या आर्थिक वर्षामध्ये समान तिमाहीत विप्रो कंपनीने 3003 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला होता. याच दरम्यान कंपनीने आपल्या समभागधारकांना 5 रुपये प्रति समभाग लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
कंपनीने सदरच्या तिमाहीमध्ये 2.58 अब्ज डॉलर्सचा महसूल प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षाच्या आधारावर पाहता 1.5 टक्के कमी आहे. पाच रुपये प्रति समभाग असा लाभांश जाहीर केला असून लाभांशाची रेकॉर्ड डेट 28 जुलै ही असणार आहे. याच दरम्यान कंपनीने दुसऱ्या तिमाहीच्या महसूल अंदाजाची माहिती दिली असून दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 2.56 अब्ज ते 2.61 अब्ज डॉलर्सचा महसूल प्राप्त होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे सीईओ श्रीनी पालिया म्हणाले की, जागतिक अस्थिर स्थितीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने मागच्या तुलनेत स्थिर नफा कमावला आहे.