महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयटी कंपन्या जनरेटिव्ह एआयमध्ये गुंतवणूक वाढवणार

06:34 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेवा कंपन्या यावर्षी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (जेएनएआय) मध्ये गुंतवणुकीत  वाढ करु शकतात कारण क्लायंट तंत्रज्ञानातील संभाव्यतेसाठी बजेटचे वाटप करत आहेत आणि सशुल्क पीओसी(संकल्पनेचे पुरावे) आयोजित करण्यास इच्छुक आहेत. आशिया-पॅसिफिक  क्षेत्रातील ग्राहकांनी जेएनएआयमध्ये तिप्पट गुंतवणूक करणे अपेक्षित आहे, जरी ते सध्या उत्तर अमेरिकन ग्राहकांपेक्षा मागे आहेत.

Advertisement

इन्फोसिस नॉलेज इन्स्टिट्यूटच्या नवीनतम संशोधनानुसार, आशिया-पॅसिफिक प्रदेशात जनएआय खर्च पुढील वर्षी 140 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, जपान, भारत आणि सिंगापूरमध्ये अंदाजे 3.4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल.

भारतीय आयटी सेवा कंपन्यांनी अद्याप त्यांच्या जेएनएआय महसूलाची गणना करणे बाकी असले तरी, अॅसेन्चेअरने सांगितले की नोव्हेंबरमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत जेएनएआयमध्ये 450 दशलक्ष डॉलर किमतीचे सौदे जिंकले, गेल्या सहा महिन्यांतील सर्वात जास्त. हे रेकॉर्ड केलेल्या 300 दशलक्ष डॉलरपेक्षा 50 टक्के अधिक आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article