कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयटीसिटी दुष्टचक्रात...

06:01 AM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशातील आयटी सिटी म्हणून बेंगळूर, पुणे व हैदराबाद या तीन शहरांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. यामध्ये पुण्यातील हिंजवडी हे बेंगळूरनंतरचे सर्वांत मोठे आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु, सध्या जागतिक दर्जाचे हे केंद्र  वाहतूक कोंडी, रस्त्याची दुर्दशा, जल कोंडी, वीज समस्या अशा विविध प्रश्नांच्या दुष्टचक्रात अडकल्याचे दिसून येते.

Advertisement

हिंजवडी आयटी पार्क सध्या चर्चेत आहे, ते येथील अनेकविध समस्यांमुळे. पुणे व परिसरात मागच्या दोन महिन्यांत झालेल्या पावसात वेळोवेळी आयटीनगरीचे पितळ उघडे पडले आहे. या हंगामात आत्तापर्यंत जवळपास तीन ते चार वेळा पावसामुळे या भागात कमरेपर्यंत पाणी साचल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे ‘बुड बुड नगरी’ किंवा ‘वॉटर पार्क’सारखी या आयटी पार्कची अवस्था होत असेल, तर त्याच्या भविष्याबाबतच चिंता निर्माण होते. हिंजवडी आयटी पार्कमध्ये अनेक राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामध्ये काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मात्र, मागच्या काही दिवसांत हे कर्मचारी येथील समस्यांनी त्रस्त झाले आहेत. पावसात येथील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्ता कुठला आणि ख•ा कुठला, हे ओळखणेही कठीण बनले आहेत. त्यात वाहतूक कोंडी तर पाचवीलाच पुजली आहे. त्यातून वाट काढताना आयटीयन्ससह सर्वांची दमछाक होत आहे. विशेषत सकाळच्या व संध्याकाळच्या टप्प्यात या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. पाच ते सात किमीच्या रांगा लागतात. त्यामुळे तब्बल अडीच ते तीन तास सर्व वाहतूक ठप्प होते. वेळ, श्र्रम अशा सगळ्याच गोष्टी वाया जातात. हिंजवडी रस्ता, माण गाव ते फेज 3, फेज 3 ते फेज 2, विप्रो सर्कल ते फेज 1 यांसह अन्य काही रस्त्यांवर वाहतुकीचा सातत्याने बोजवारा उडत आहे. परंतु, त्यातून सोल्यूशन सापडताना दिसत नाही. हिंजवडी परिसरात डोंगररांगा आहे. तथापि, तेथून येणारे पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण होत आहे. मेट्रोचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर या बांधकामेही मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहेत. डेनेज व्यवस्थाही या भागात सक्षम दिसत नाही. परिणामी पाण्याचा निचरा होणे कठीण जात आहे. कचरा समस्या, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे तसेच नैसर्गिक ओढे, नाले अडवल्याचाही परिणाम येथील व्यवस्थेवर होत आहे. आयटी नगरीचा कारभार तीन यंत्रणांकडे आहे. एमआयडीसी, पीएमआरडीए व स्थानिक ग्रामपंचायत. परंतु, त्यांच्यात समन्वय दिसत आहे. त्यामुळे गोंधळात भर पडत आहे.

Advertisement

अनेक कंपन्यांचा काढता पाय 

हिंजवडी आयटी पार्कचा काल-परवापर्यंत चांगलाच बोलबाला होता. मात्र, मागच्या दोन ते तीन वर्षांत वाहतूक कोंडी व तत्सम प्रश्नांमुळे आयटी पार्कचे अवमूल्यन होऊ लागले आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी येथून आपला गाशा गुंडाळला आहे. पुणे व भवतालच्या परिसराच्या अर्थकारणात हिंजवडी आयटी पार्कची भूमिका महत्त्वाची आहे. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या अर्थबळामध्ये या आयटी उद्योगाचा रोल आहे. असे असताना अशा पद्धतीने या नगरीची अशी प्रतिमा होणे, हे मागे नेणारेच म्हणता येईल.

टोलवाटोलवीचा फटका 

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एम आयडीसीने उ•ाणपुलासह पर्यायी रस्त्यांचे सुमारे 650 कोटी ऊपयांच्या प्रकल्पाचे नियोजन केले आहे. परंतु, या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा चेंडू पीएमआरडीएने म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पुन्हा एमआयडीसीकडेच ढकलला आहे. या प्रशासकीय टोलवाटोलवीने हा प्रकल्प लांबणीवर पडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महापालिकेत हिंजवडीसह सात गावांच्या समावेशाची मागणी 

हिंजवडी, माणसह लगतची गावे ही अद्याप ग्रामपंचायतीत आहे. या गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी आता जोर धरत आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन ही मागणी लावून धरली आहे. येथे 700 हेक्टर तीन फेजमधील एकूण कंपन्या 150 असल्याचे सांगण्यात येते. मात्र, पालिका तरी सक्षम सेवा पुरवणार का, हा प्रश्न कायम असेल.

पालिकांना बोजा सोसवेना 

आयटीतील बक्कळ पगाराची नेहमीच चर्चा होते. सोई-सुविधांसाठी पैसे मोजण्याची तयारी असल्याने हिंजवणी, माण, माऊंजीच्या अगदी टोकापर्यंत नामांकित बिल्डर्सच्या टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या आहेत. यातून बऱ्याच प्रमाणात सरकारला पैसा मिळत आहे. पण शहरांत प्रचंड वेगात विकास होत असताना पालिकेला मात्र त्या प्रमाणात सुविधा देणे अवघड जात आहे. भारतात शहर नियोजन हा प्रकार दुर्मीळच आहे. टाऊन प्लॅनिंग ही गोष्ट अस्तित्त्वात असली तरी शहरातील दर परवडत नसल्याने उपनगरे, ग्रामपंचायतीत लोकांनी घरे बांधली. पुणे महापालिकेने 33 गावे पुणे पालिकेत सामविष्ट केली आहेत. मात्र, येथील पायाभूत सुविधांच्या नावाने बोंबच आहे. ख•dयातील रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सार्वजनिक वाहतुकीच्या प्रश्नांसाठी समाविष्ट गावांनी मध्यंतरी आंदोलनही केले. हिंजवडीतील पाणी कोंडीचा प्रश्न हा आयटीयन्समुळे मोठा झाला आणि राज्य स्तरावर आला. येथून मोठ्या प्रमाणात सरकारला उत्पन्न मिळते. कर्मचाऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि कंपन्या आता शहरातून काढता पाय घेत असल्याने आमदार, खासदार आता रस्त्यावर उतरून हा प्रश्न मांडत आहेत. त्यातच पर्यायी रस्त्यांचा पर्याय पुढे केला जात आहे. हिंजवडी मेट्रोची ट्रायल घेण्यात आली आहे. मेट्रोनंतर तरी यात काही फरक पडेल, अशी आशा आहे.

मेट्रोची ट्रायल रन; सप्टेंबरमध्ये होणार सुरू

माण हिंजवडी ते शिवाजीनगर यांना जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाइन 3 प्रकल्पाचे काम 87 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम अंतिम टप्प्यात आहे. त्याअनुषंगाने 4 जुलैला मेट्रोची माण डेपो ते पीएमआर चार स्थानकापर्यंत पहिली चाचणी घेण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), टाटा आणि सीमेन्स समूहाच्या नेतृत्वाखालील पुणे आयटी सिटी मेट्रो रेल यांच्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प प्रगतिपथावर आहे.

बेंगळूरमध्येही समस्यांची मालिका....

पुण्याबरोबरच बेंगळूर हे शहर आयटी सिटी म्हणूनच प्रसिद्ध आहे. नामांकित आयटी कंपन्यांचे हेड ऑफिस या शहरात असल्याने कायमच आयटीयन्सना हे शहर खुणावत असते. त्यामुळेच या शहराचा विकास तितकाच जोमाने झाला आहे. यातील भाडेतत्त्वावर तसेच नवीन सदनिकांची किंमतदेखील डोळे फिरविणारी आहे. किंबहुना बेंगळूर रहिवाशांचा इन्कम सोर्स हा भाड्यापोटी येणारा पैसा हाच आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे येथील पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे. बेंगळूर शहर तसे शिस्तबद्ध पद्धतीने चालणारे. मात्र, वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा ताण यामुळे आयटीच्या डोलाऱ्यामागील सत्य मात्र आता उघडे पडत आहे. वाहतुकीचा तासन्तास खोळंबा, पावसाळ्यात ठिकठिकाणी तुंबणारे पाणी, सांडपाण्याचा निचरा न होणे, पिण्याच्या पाण्याची समस्या, शहर नियोजनाअभावी उभ्या राहिलेल्या इमारती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या हा येथील नित्यक्रम ठरला आहे.

स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा : सुप्रिया सुळे

राजीव गांधी आयटी पार्क, माण, माऊंजी आदी भागांचा समावेश असणारे एक स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची गरज खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. यावर सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. यामुळे नागरिकांना आपल्या अडीअडचणींबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

हिंजवडीच्या समस्या सोडविण्यासाठी बृहत आराखडा : मुख्यमंत्री

हिंजवडीप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विशेष बैठक घेतली. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पूरस्थिती निर्माण होते. विविध समस्येवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.

मेट्रोचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंजवडी परिसरातील गर्दी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढली, तर कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी मेट्रोची कामेही त्वरित होणे आवश्यक आहे. मेट्रो स्टेशनची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या आहेत.

एकूणच काय तर राज्याचे महत्त्वाचे केंद्र असलेले आयटी पार्क आज अडचणीत आले आहे. ट्रम्पनीतीमुळे आयटी क्षेत्राला चटके बसायला आधीच सुऊवात झाली आहेत. त्यातच वाहतूक कोंडी व तत्सम प्रश्नांमुळे या आयटीनगरीचे भवितव्यच धोक्यात आले आहे. हे बघता आयटी सिटीचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी आगामी काळात गंभीरपणे पावले उचलावी लागतील.

- अर्चना माने-भारती, पुणे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article