नराला मादीचे स्वरुप देणे झाले सोपे
वैज्ञानिकांनी क्रोमोसोम्ससोबत कुठल्याही नर जीवाला मादी करणे आता अत्यंत सोपे ठरले आहे. वैज्ञानिकांनी क्रोमोसोम्ससोबत केलेल्या प्रयोगामुळे नर उंदिर आता मादी उंदिर झाला आहे. सस्तन प्राण्यांच्या क्रोमोसोम्समध्ये कुठल्याही जीवाचे नर किंवा मादी निर्धारण करण्याची शक्ती असते. क्रोमोसोम्सच कुठल्याही जीवाची पुढील पिढी नर असणार का मादी हे ठरवत असतात.
एका नव्या अध्ययनात वाय क्रोमोसोम्सच्या काही छोट्या कणांना हटविण्यात आल्यास नर जीव मादी होत असल्याचा खुलासा झाला आहे. या छोट्या कणांना मायक्रोआरएनए म्हटले जाते. हे अध्ययन अलिकडेच नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झाले आहे. काही खास जीन्सना मायक्रोआरएनएमधून हटविताच नर उंदिर मादीमध्ये रुपांतरित झाल्याचे यात नमूद आहे.
या प्रक्रियेमुळे लिंग परिवर्तनाची प्रक्रिया सोपी झाली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॅनेडामध्ये जेनेटिक्सचे प्राध्यापक आणि या अध्ययनाचे सह-लेखक राफेल जिमिनेज यांनी आम्हाला या अध्ययनाच्या निष्कर्षावर विश्वासच होत नव्हता, याच्या द्वारे भविष्यात कुठल्याही देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारता येणार असल्याचे म्हटले आहे.
सस्तन जीवांमध्ये एक जीन नराच्या शरीराला विकसित करतो. तर दुसरा जीन्स मादीचे शरीर विकसित करत असतो. हे काम गर्भधारणेच्या काही आठवड्यांमध्येच होते. जीवांच्या विकासाच्या प्रारंभिक टप्प्यात सस्तन प्राण्यांना नर का मादी जन्माला येणार हे ठरविण्याची शक्ती मिळाली होती. वाय क्रोमोसोम्समध्ये एक जीन आढळून येते, याचे नाव एसआरवाय आहे. हा जीनच नर का मादी हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
मानवी जीनोमसमवेत 98 टक्के सस्तन प्राण्यांच्या डीएनएमध्ये प्रोटीनसाठी कोडिंग नसते. याचमुळे कोणकोणत्या जीनमुळे नर की मादी हे ठरते हे वैज्ञानिकांना आतापर्यंत समजू शकलेले नाही. दीर्घकाळापर्यंत ज्यांना जंक डीएनए म्हटले जात राहिले, ते प्रत्यक्षात नॉन-कोडिंग आरएनएमध्ये रुपांतरित होतात. आरएनए शरीरात अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियांना प्रभावित करतात. याचा एक चतुर्थांश हिस्सा मायक्रोआरएनए असतो. हे अनेक प्रकारच्या जीन्ससोबत जोडलेले असता. हजारो मायक्रोआरएनए दरम्यान वैज्ञानिकांनी 6 चा शोध लावला आहे. या 6 जीन्समुळे जन्माला येणारा जीव नर का मादी हे ठरत असते.
वैज्ञानिकांनी उंदरांमध्sय विकसित होणाऱ्या भ्रूणातून 6 जीन्स हटविले, उंदिर विकसित होणाऱ्या भ्रूणात कोणता क्रोमोसोम सेट आहे हे त्यांना माहित नव्हते. परंतु कुठल्या जीन्स हटविल्याने काय होईल हे ठाऊक होते. त्यांनी 6 जीन्स हटविताच एक्सवाय क्रोमोसोम असलेला उंदिर मादीत बदलू लागला. तर एक्सएक्स असलेला नर नरच राहिला.