चंद्रावर आढळले हायड्रोक्सिल
खनिजांचा नकाशा तयार करताना मिळाला पाणी अन् ऑक्सिजनचा खजिना
चंद्राच्या पृष्ठभागावर चहुबाजूला पाणी आणि त्याचे वेगळे रुप हायड्रोक्सिलचे मोठे प्रमाण आढळून आले आहे. वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर खनिजांचा नकाशा तयार केला असता हा खुलासा झाला आहे. यामुळे भविष्यात चंद्राची भौगोलिक स्थिती, इतिहास आणि सध्या तेथे जे काही घडतेय ते जाणून घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे.
भविष्यात चंद्रांवर मानवयुक्त उ•ाणांकरता एक नवा उद्देश मिळणार आहे. प्लॅनेटरी सायन्स इन्स्टीट्यूटचे सायंटिस्ट रोजर क्लार्क यांनी भविष्यातील अंतराळवीर चंद्राचे इक्वेटर म्हणजेच भूमध्यरेषेनजीकच्या पाण्याचा वापर करू शकतात, कारण ते पृष्ठभागावरून पाणी मिळविण्याचे तंत्रज्ञान स्वत:सोबत नेतील, किंवा ध्रूवीय भागांमधील क्रेटर्समधून पाणी मिळवू शकतील असे म्हटले आहे.
केवळ चंद्रावर पाणी आहे हे जाणून घेतल्याने आम्ही त्याच्याविषयी सर्वकाही जाणू शकणार नाही. तसेच चंद्राचा पृष्ठभाग आणि अंतर्गत आवरणांचा इतिहास जाणून घ्यावा लागणर आहे. पाणी कुठे मिळू शकते हे त्यामुळे समजू शकणार असल्याचे क्लार्क यांनी नमूद पेले आहे.
पृष्ठभागाखाली मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन
चंद्रावर तलाव, सरोवर तसेच नद्या नाहीत. परंतु प्रत्येक अध्ययनात तेथे मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते. हे पाणी पृष्ठभागात अडकून आहे, चंद्राच्या अन्य हिस्स्यांमध्येही पाणी असु शकते. मोठ्या प्रमाणात ऑक्सिनज असण्याचीही शक्यता आहे, कारण तेथे हायड्रोक्सिल मिळाले असल्याचे क्लार्क यांचे सांगणे आहे.
खनिजांमधून मिळवू शकतो पाणी
हायड्रोक्सिलन एक कण ऑक्सिन आणि एक कण हायड्रोजनद्वारे तयार होतो. चंद्राच्या खनिजासोबत हायड्रोक्सिल पृष्ठभागाखाली मोठ्या प्रमाणात आहे. खनिजांसोबत ते बाहेर काढण्याची गरज आहे, मग त्याद्वारे पाणी आणि ऑक्सिजन मिळविता येणार आहे. हे सर्वकाही चंद्राच्या पृष्ठभागात आहे.
खडकातही ऑक्सिजन अन् पाणी
वैज्ञानिकांनी चंद्राच्या पृष्ठभागावर इग्नियस दगड पाइरोक्सीनचा शोध लावला आहे, त्यातही पाण्याचे संकेत मिळाले आहेत. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पडतो तेथे कमी कण मिळणार आहेत. तर अंधारयुक्त हिस्स्यात अधिक कण मिळणार असल्याचे क्लार्क यांनी म्हटले आहे.