For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लडाख’मध्ये सहाव्या परिशिष्टाचा मुद्दा

06:22 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘लडाख’मध्ये सहाव्या परिशिष्टाचा मुद्दा
Advertisement

लडाखमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. प्रारंभीच्या कार्यक्रमानुसार तेथे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार होते. तथापि, नंतर या कार्यक्रमात थोडे पारिवर्तन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ केल्यानंतरची या मतदारसंघातील ही प्रथमच लोकसभा निवडणूक आहे. लडाख हा पूर्वी जम्मू-काश्मीर राज्याचा भाग होता. 2019 पासून  त्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्यात आलेले आहे.

Advertisement

लडाख हा विस्ताराने देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. त्याचे क्षेत्रफळ 59 हजार चौरस किलोमीटरपेक्षा अधिक आहे. हे क्षेत्रफळ भारताची राजधानी असणाऱ्या दिल्लीपेक्षा 40 पट मोठे आहे. मात्र, या मतदारसंघात मतदारांची संख्या केवळ दोन लाख आहे.

हिंदू, बौद्ध आणि मुस्लीम येथे जवळपास समान संख्येने आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता. या पक्षाचे उमेदवार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी येथे 10 हजाराहून अधिक मतांनी यश प्राप्त केले होते. यावेळी येथे भारतीय जनता पक्षाने ताशी ग्यालसान या युवकाला उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने सेरिंग नामग्याल यांना उतरविले आहे.

Advertisement

सहाव्या परिशिष्टाचा प्रश्न

घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याची मागणी याच प्रदेशातून प्रथम करण्यात आली होती. ती पूर्ण झाल्यानंतर आता येथे घटनेच्या सहाव्या परिशिष्टाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या मुद्द्यावर मोठा वादही निर्माण झाला होता. देशाच्या विशिष्ट भागांना त्यांची सांस्कृतिक आणि इतर ओळख टिकविण्यासाठी या परिशिष्टाच्या अंतर्गत विशेष अधिकार दिले जातात. केंद्र सरकारने तसे आश्वासन येथील जनतेला दिले असून ते त्वरित पूर्ण होणार आहे.

Advertisement
Tags :

.