महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रोचे जिओपोर्टल ‘भुवन’

06:37 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुगलपेक्षा 10 पट अधिक शक्तिशाली

Advertisement

जिओपोर्टल-भुवन एकप्रकारचे वेबपोर्टल असून त्याचा वापर इंटरनेटद्वारे भौगोलिक माहिती (भू-स्थानिक माहिती) आणि अन्य संबंधित भौगोलिक सेवांना शोधणे तसेच त्यांचा वापर करण्यासाठी केला जातो. भुवनला गुगल मॅप्सची भारतीय आवृत्ती देखील म्हटले जाते. हे एक बहुउद्देशी सॅटेलाइट अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्म आहे. भुवन वेबपोर्टलचे संचालन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) केले जाते. कृषी, शहरनियोजन अˆणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भुवन मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते.

Advertisement

हे सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन वापरकर्त्यांना पृथ्वीच्या पृष्ठभागाचे 2डी/3डी पिक्चर पाहण्याची अनुमती देते. हे अॅप्लिकेशन भारतीय क्षेत्राकरता अत्याधिक रिझोल्यूशन प्रदान करते. हे अन्य सॉफ्टवेअरच्या तुलनेत एक मीटरपर्यंतच्या लोकल रिझोल्युशनरसोबत भारतीय स्थानांचे ब्रॉड इमिजेनेशन प्रदान करते. सुरक्षा चिंतांमुळे उपलब्ध इमेजिसमध्ये भारताची कुठलीही संरक्षण प्रतिष्ठा सामील नाही. सामग्री चार प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करविण्यात आली आहे.

जेव्हा तुम्ही इंडिया जियोपोर्टल-भुवनचा वापर करता तेव्हा ते तुम्हाला गुगलकडून मिळणाऱ्या माहितीपेक्षा दहापट अधिक माहिती उपलब्ध करते. आम्ही दोन महत्त्वपूर्ण माहिती प्रसार उपकरणे भुवन पंचायत आणि एनडीएईएम तयार केली आहेत असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले आहे. अलिकडेच इस्रो आणि मॅप माय इंडियाने भुवन सुरू करण्यासाठी परस्परांमध्ये भागीदारी केली होती. हे भारतात लागू भू-स्थानिक क्षेत्राशी संबंधित नव्या दिशानिर्देशांच्या अनुरुप आहे. भुवन या अॅप्लिकेशनवर अनेक क्षेत्राशी निगडित विस्तृत भौगोलिक आकडेवारी आहे. कृषी, शहरनियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयांसाठी हे अॅप्लेशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

किती महत्त्वपूर्ण आहे पोर्टल

हे पोर्टल भारत सरकारकडून उपलब्ध माहितीनुसार देशाच्या वास्तविक सीमा दर्शविणार आहे. विदेशी मॅप्स अॅपऐवजी मॅप माय इंडियाच्या अॅप्लिकेशनचा वापर करत लोक स्वत:च्या गोपनीयतेचे उत्तरप्रकारे रक्षण करू शकतात. विदेशी सर्च इंजिन आणि कंपन्या फ्री मॅप सादर करण्याचा दावा करतात. परंतु प्रत्यक्षात त्या जाहिरातीसोबत युजरला टार्गेट करत त्याच्या गोपनीयतेवर आक्रमण करत असतात. त्याचे लोकेशन आणि वैयक्तिक माहितीसंबंधी डाटाचा लिलाव करून विदेशी कंपन्या पैसा कमावितात. परंतु मॅप माय इंडियामध्ये अशाप्रकारची कुठलीच जोखीम नाही.

7.5 लाख गावे आणि 7500 शहरे सामील

भुवन एक भारतीय पोर्टल असल्याने सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला मजबुती मिळणार आहे. इस्रोची सहकारी मॅप माय इंडिया एक भारतीय तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी डिजिटल मॅप संबंधी डाटा, टेलिमॅक्स सेवा, ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स संबंधी सेवा प्रदान करते. हा गुगल मॅपचा एक पर्याय आहे, ज्यात 7.5 लाख गावे आणि 7500 शहरे सामील आहेत.

डाटाबेसमध्ये 63 लाख किमी रोड नेटवर्क

भुवनच्या डाटाबेसमध्ये 63 लाख किलोमीटरचे रोड नेटवर्क आहे. हा देशाचा सर्वात विस्तृत डिजिटल मॅप डाटाबेस असल्याचा संस्थेचा दावा आहे. भारतात जवळपास सर्व वाहननिर्माते बिल्ट इन नेव्हिगेशन सिस्टीम प्रदान करतात. ते मॅप माय इंडियाचा वापर करत आहेत. मूव नावाचा अॅप देखील रियल टाइम ट्रॅफिक अपडेट आणि नेविगेशन सुविधा प्रदान करते.

एनडीईएम पोर्टल

एनडीईएम पोर्टला आपत्ती आणि आपत्कालीन स्थितीदरम्यान स्थितीजन्य मूल्यांकन आणि प्रभावी निर्णय घेण्यासाठी पूर्ण देशासाठी एक व्यापक, संरचित, बहुस्तरीय भू-स्थानिक डाटाबेस प्रदान करते. हे देशात प्रभावीपणे आपत्ती जोखीम करण्यासाठी आणि सर्व नैसर्गिक आपत्तींमध्ये माहिती प्रदान करण्यासाठी एका राष्ट्रीय स्तरीय भू-पोर्टलच्या स्वरुपात काम करते. एनडीईएम इस्रोच्या आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापन क्षमतांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण डाटासेट एकत्रित करते. हे टूल आणीबाणीच्या काळात जोखीम मूल्यांकन आणि शमन करण्यास मदत करते, सामाजिक लाभासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा ला घेण्याच्या इस्रोच्या वचनबद्धतेला प्रतिबिंबित करते.

निर्णयप्रक्रिया होणार वेगवान

भुवनचा डाटा केवळ अधिक व्यापक नाही तर उच्च स्थानिकीकरण देखील आहे. तसेच तो विशिष्ट गरजा आणि जमिनीच्या स्तरावर येणाऱ्या आव्हानांचीही पूर्तता करतो. तपशीलांचा हा स्तर अनेक क्षेत्रांमध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला लक्षणीय वेग प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. भुवनच्या बरोबरीने दोन नवीन साधने लाँच करण्यात आली आहेत, त्यांच्या क्षमतांचा आणखी विस्तार केला जात आहे. भुवन-पंचायत हे टूल समृद्ध डाटासेट आणि विश्लेषणात्मक साधनांचा पुरवठा करून स्थानिक प्रशासनाला सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना तपशीलवार भू-स्थानिक डाटावर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेण्यास भुवन-पंचायत सक्षम करते. तसेच स्थानिक समस्यांना अधिक प्रभावीपणे संबोधित करते.

मुख्य वैशिष्ट्यो आणि लाभ  तपशीलवार आणि अचूक डाटा

भुवन उच्च रिझोल्युशन उपग्रहआधारित प्रतिमा आणि तपशीलवार मॅपिंग डाटा पुरविण्यास उत्कृष्ट आहे. यात 7.5 लाख खेडी आणि 7,500 शहरे आणि संपूर्ण भारतातील 3 कोटी ठिकाणांचे नकाशे समाविष्ट करून गावपातळीपर्यंतची माहिती समाविष्ट आहे.  तपशीलाचा हा स्तर गुगल मॅप्स सध्या जे ऑफर करतो, विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागात त्यापेक्षा अधिक आहे.

गोपनीयता-केंद्रीत

गुगल मॅप्स अनेकदा लक्ष्यित जाहिरातींद्वारे वापरकर्त्याच्या डाटाची कमाई करतो. तर भुवनची रचना गोपनीयता-केंद्रीत दृष्टीकोनाने करण्यात आली आहे. मॅपमाप इंडिया, इस्रोचा भागीदार असून वापरकर्ता डाटा विकला जाणार नाही किंवा जाहिरातींसाठी वापरला जाणार नाही हे सुनिश्चित करण्यात आले आहे. यामुळे भुवन गोपनीयता-जागरुग वापरकर्त्यांसाठी एक सुरक्षित पर्याय ठरतो.

स्वदेशी पर्याय : भुवन हे आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे फलित आहे, ज्याचा उद्देश भू-स्थानिक गरजांसाठी स्वदेशी पर्याय प्रदान करणे आहे. हे  संवेदनशील भू-स्थानिक डाटा भारतातच राहिल  याची खात्री करून राष्ट्रीय सुरक्षिततेला चालना देण्यासोबत स्थानिक तंत्रज्ञान विकासाला देखील समर्थन देते.

विशेष सेवा : भुवन आपत्ती व्यवस्थापन समर्थन, शहरी नियोजन आणि कृषी निरीक्षण यासारख्या विशेष सेवांची श्रेणी देत. या सेवा रिअल-टाइम डाटा आणि अॅनालिसि प्रदान करण्यासाठी इस्रोच्या विस्तृत उपग्रह नेटवर्कचा वापर करतात. यामुळे विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी निर्णय घेण्यास मदत होणार आहे. अॅप्लिकेशन्स आणि इम्पॅक्ट भुवनच्या विस्तृत भू-स्थानिक डाटा ऑफरिंग विविध क्षेत्रांमध्ये तपशीलवाल अंतर्दृष्टी आणि मौल्यवान साधनसामग्री प्रदान करतात.

कृषी क्षेत्र : शेतकरी आणि कृषी नियोजक भुवनचा डाटा पीक निरीक्षण, मृदा आरोग्य विश्लेषण आणि साधनसामग्री व्यवस्थापनासाठी वापरू शकतात. यामुळे अधिक कार्यक्षम शेती पद्धती आणि उत्पादकता वाढू शकते.

शहरी नियोजन : पायाभूत सुविधा प्रकल्पांची रचान आणि अंमलबजावणी करण्यासाठी, जमिनीचा वापर ऑप्टिमाइज करण्यासाठी आणि शहरी विकासाचे शाश्वत व्यवस्थापन करण्याकरता शहरी नियोजनकार तपशीलवार नकाशे आणि डाटासेटची मदत घेऊ शकतात.

आपत्ती व्यवस्थापन : एनडीईएमच्या एकत्रीकरणामुळे आपत्ती प्रतिसादासाठी क्षमता वाढणार आहे. अचूक आणि वेळेवर डाटा नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन, नुकसान कमी करणे आणि जीवितहानी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

तांत्रिक प्रगती : भुवनमधील तांत्रिक प्रगती ही इस्रोच्या नवोपक्रमाच्या समर्पणाचा पुरावा आहे. गुगलच्या ऑफरपेक्षा दहापट अधिक तपशीलवार डाटा प्रदान करून भुवनने भौगोलिक डाटा विश्लेषणांमध्ये एक नवा मापदंड निश्चित केला आहे. ही वाढलेली ग्रॅन्युलॅरिटी माहितीच्या विस्तृत श्रेणीला व्यापते, विविध स्तरांवर संबंधित घटकांना उपग्रहीय प्रतिमा आणि अन्य अवकाशीय डाटामधून प्राप्त केलेली प्रतिसादक्षम अंतर्दृष्टी प्रदान करते. जिओपोर्टल-भुवन हे भारताच्या भौगोलिक क्षमतांमध्ये लक्षणीय झेप घेते. भुवन-पंचायत आणि एनडीईएम सारख्या साधनांसह इस्रो केवळ डाटा अॅक्सेस वाढवत नाही, तर स्थानिक प्रशासनाचे सक्षमीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन सुधारत आहे. जसजसे भुवन विकसित होत आहे तसतसे ते डिजिटल पायाभूत सुविधांचा पाया म्हणून उभे ठाकले आहे, तसेच ते देशभरातील विविध गरजा पूर्ण करण्यासाठी मजबूत उपाययोजना प्रदान करते.

- संकलन - उमाकांत कुलकर्णी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article