For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वयाच्या 61 व्या वर्षी इस्रो प्रमुखांकडून पीएचडी पूर्ण

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
वयाच्या 61 व्या वर्षी इस्रो प्रमुखांकडून पीएचडी पूर्ण
Advertisement

आयआयटी मद्रासमध्ये घेतला होता प्रवेश

Advertisement

वृत्तसंस्था /चेन्नई

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात मोठे यश मिळविले आहे. त्यांनी वयाच्या 61 व्या वर्षी स्वत:चे पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आयआयटी मद्रासच्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान शुक्रवारी ही पदवी प्रदान करण्यात आली. आता एअरोस्पेस इंजिनियर अणि इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या नावाअगोदर डॉक्टर असा उल्लेख असणार आहे. डॉ. सोमनाथ यांच्याकडे यापूर्वीच पीएचडीच्या जवळपास 12 पदव्या आहेत. भारताचा अवजड प्रक्षेपक लाँच मार्क व्हेईकल मार्क-3 चे प्रमुख विकासक म्हणून त्यांचे कार्य आणि चंद्राच्या दक्षिण ध्रूवाजनीक विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगमधील त्यांच्या भूमिकेमुळे अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केले आहे.

Advertisement

संशोधनाच्या माध्यमातून पहिली पीएचडी

संशोधनाच्या माध्यमातून एस. सोमनाथ यांना प्राप्त झालेली ही पहिली पीएचडी आहे. एक टॉपर असलो तरीही एका गावातील युवक म्हणून माझ्याकडे आयआयटीची प्रवेश परीक्षा देण्याची हिंमत नव्हती. परंतु एक दिवस मी येथूनच पदवीधर होईन असे माझे स्वप्न हेते. बेंगळूरच्या प्रतिष्ठित विज्ञान संस्थेतून मी स्वत:ची मास्टर डिग्री मिळविली आणि आता आयआयटी-मद्रासमधून पीएचडी पूर्ण केल्याचे उद्गार सोमनाथ यांनी काढले आहेत. आयआयटी मद्राससारख्या प्रतिष्ठित संस्थेतून पीएचडी पूर्ण करणे अवघड असते, हा एक प्रदीर्घ प्रवास राहिला. मी अनेक वर्षांपूर्वी नोंदणी करविली होती. संशोधनाचा विषय वायब्रेशन आयसोलेटरशी संबंधित होता. दशकांपूर्वी इस्रो प्रकल्पात एक इंजिनियरच्या स्वरुपात या विषयाशी माझा संबंध आला होता असे सोमनाथ यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.