For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाम लवकरच मुस्लीमबहुल राज्य !

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आसाम लवकरच मुस्लीमबहुल राज्य
Advertisement

मुख्यमंत्री हिमांत बिस्व सरमा यांचे वक्तव्य

Advertisement

वृत्तसंस्था/आसाम

आसाम हे राज्य 2041 पर्यंत, म्हणजे आणखी 17 वर्षांमध्ये मुस्लीमबहुल होईल, अशी शक्यता या राज्याचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सरमा यांनी व्यक्त केली आहे. या राज्यात मुस्लिमांची संख्या झपाट्याने वाढ आहे. हिंदूंच्या संख्यावाढीचा वेग त्यामानाने बराच कमी आहे. त्यामुळे लवकरच या राज्याची लोकसंख्यात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आसाममध्ये सध्या मुस्लिमांची संख्या 40 टक्के आहे. दर दहा वर्षांनी मुस्लिमांची लोकसंख्या 30 टक्के वाढते असे आतापर्यंतच्या शिरगणतीच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. गेली 30 वर्षे मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीचा वेग अशाप्रकारे 10 वर्षांमध्ये 30 टक्के असा राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे 2041 मध्ये जेव्हा जनगणना होईल, तेव्हा हे राज्य मुस्लीम बहुल झालेले पहावयास मिळेल, असा इशारा त्यांनी येथील एका कार्यक्रमात दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.