गाझापट्टीत इस्रायलचा बॉम्बवर्षाव सुरूच
रफाह (गाझा सिटी)
: इस्रायली युद्ध विमानांनी गाझा पट्टीच्या काही भागांवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा बॉम्बवर्षाव केला. सुरक्षा परिषदेच्या बहुसंख्य सदस्यांनी आणि इतर अनेक राष्ट्रांचा पाठिंबा असूनही, गाझामध्ये तात्काळ मानवतावादी युद्धविरामाची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाला युनायटेड स्टेट्सने व्हेटो केल्यानंतर हे ताजे हल्ले झाले. हवा, जमीन आणि समुद्रातून होणारे हल्ले तीव्र असल्याचे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टिनींना भूभागाच्या दक्षिणेकडे स्थलांतरित होण्यास सांगण्यात आले आहे. गाझाच्या इस्रायल आणि इजिप्तच्या सीमा प्रभावीपणे सील केल्या आहेत. पॅलेस्टिनींना या प्रदेशात आश्र्रय घेण्याशिवाय पर्याय नाही. गाझामधील एकूण पॅलेस्टिनी मृतांची संख्या 17,400 च्या पुढे गेली आहे. त्यापैकी बहुतेक महिला आणि मुले आहेत.