कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

12 वर्षांनंतर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला

06:08 AM Dec 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीरियात जाणवला भूकंप : आण्विक स्फोटासारखे दिसले दृश्य

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

सीरियावर एचटीएस बंडखोरांच्या कब्जानंतर इस्रायल तेथे जोरदार हवाई हल्ले करत आहे. इस्रायलच्या वायुदलाने नव्या हल्ल्यात उत्तर-प9िचम सीरियातील टार्टस शहराला लक्ष्य केले आहे. मागील 12 वर्षांमध्ये सीरियात इस्रायलने केलेला हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे बोलले जात आहे. यामुळे तेथे भूकंपासारखा झटका जाणवल आहे. या हल्ल्यानंतर मोठा विस्फोट झाला असून मशरुमप्रमाणे आगीचा विशाल गोळा तयार झाला. टार्टस शहरातच रशियाच्या नौदलाचा तळ देखील आहे.

इस्रायलच्या सैन्याने सीरियाच्या सैन्याच्या शस्त्रास्त्र आणि स्फोटकांच्या भांडाराला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यानंतर परिसरात रिश्टर स्केलवर 3 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे.  इस्रायलच्या सैन्याने एअर डिफेन्स युनिट आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सीरियन क्षेपणास्त्रांच्या भांडाराला नष्ट केले. 2012 नंतर सीरियाच्या किनारी क्षेत्रात झालेला हा सर्वात मोठा हल्ला होता. बसर अल-असाद यांनी रशियात पलायन केल्यावर इस्रायलच्या सैन्याने सीरियात 300 हून अधिक हल्ले केले आहेत.

इस्रायलच्या सैन्याचा बफर झोनमध्ये प्रवेश

आण्विक विस्फोटाप्रमाणे झालेल्या या स्फोटाचा प्रभाव सुमारे 30 मिनिटांपर्यंत राहिला आहे. पूर्ण भागात तोफगोळे आणि शस्त्रास्त्रs नष्ट होण्याचा आवाज ऐकू येत होता. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सीरियाच्या विविध हिस्स्यांमधील सैन्य शस्त्रागारांवर अनेक हवाई हल्ले केले आहेत. जामानजीकच्या बटालियन 107 च्या क्षेपणास्त्र साठ्यांना आणि टार्टसमध्ये शस्त्रास्त्रांच्या गोदामांना लक्ष्य करण्यात आल आहे. तर रविवारी संध्याकाळी इस्रायलच्या लढाऊ विमानाने पूर्व सीरियाच्या दीर अल-जौर सैन्यतळावरील रडार स्टेशन्सवर हल्ला केला होता. तर दुसरीकडे इस्रायलच्या सैनिकांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीत असलेल्या बफर झोनमध्ये प्रवेश केला आहे.

एचटीएसकडून इस्रायलला इशारा

इस्रायलने रविवारी रात्री पाच तासांपेक्षा कमी कालावधीत सीरियाच्या सैन्यतळांवर 61 क्षेपणास्त्रs डागली आहेत. या हल्ल्यांमध्ये होम्स, डेरा, सुवेदा आणि दमास्कसनजीक कलामौन पर्वतांमधील सैन्य गोदामांना लक्ष्य करण्यात आले. तसेच हामा वायुतळावरही हल्ले झाले आहेत. हयात तहरीर अल-शामचा नेता आणि सीरियाच्या नव्या प्रशासनाचा प्रमुख अहमद अल-शराने इस्रायल आता सीरियातील स्वत:च्या हल्ल्यांना योग्य ठरवू शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच सीरिया ाता नव्या संघर्षात अडकू इच्छित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article