महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

5 नोव्हेंबरपूर्वी इराणवर हल्ला करणार इस्रायल

06:40 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कच्चे तेल, आण्विक प्रकल्पांवर हल्ला करणार नाही : नेतान्याहू

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

इराणच्या आण्विक कार्यक्रम आणि कच्चे तेल प्रकल्पांवर हल्ला करणार नसल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी स्पष्ट पेले आहे. इस्रायल कुठल्याही क्षणी इराणच्या सैन्य तळांवर हल्ला करण्यास तयार आहे. इस्रायल 5 नोव्हेंबरपूर्वी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

मागील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली होती. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी इराणवर प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांच्या पर्यायांवर चर्चा केली होती. इराणच्या आण्विक आणि कच्चे तेल प्रकल्पांवर हल्ल्याचे समर्थन करणार नसल्याचे बिडेन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सैन्यतळांना केले जाणार लक्ष्य

इस्रायल इराणच्या कच्चे तेल आणि आण्विक प्रकल्पांवर हल्ले करणार नसल्याचे नेतान्याहू यांनी बिडेन यांना सांगितले आहे. इस्रायल इराणच्या सैन्यतळांवर हल्ला करण्यास तयार असल्याचे नेतान्याहू यांनी बिडेन यांना उद्देशून म्हटले होते.

अमेरिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी

अमेरिका आणि इस्रायल एकत्रितपपणे इराणवरील हल्ल्याची योजना आखत आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीवर कुठलाही प्रतिकूल प्रभाव पडू नये अशाप्रकारे हल्ल्याचा प्लॅन आखण्यास इस्रायल सहमत असल्याचे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे.

...म्हणून कच्चे तेल प्रकल्पांवर हल्ला नाही

इराणच्या कच्चे तेल प्रकल्पांवर हल्ला करण्यात आल्यास जागतिक स्तरावर कच्च तेलाच्या किमती वधारणार आहेत. असे झाल्यास डेमोक्रेटिक उमेदवार कमला हॅरिस यांना जनतेच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. तर कमकुवत असल्याच्या धारणेपासून वाचण्यासाठी 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी इस्रायल इराणवर हल्ला करणार असल्याचे समजते.

इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला

1 ऑक्टोबर रोजी इराणने 180 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह इस्रायलवर हल्ला केला होता. यातील बहुतांश क्षेपणास्त्रांना इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने आकाशातच नष्ट केले होते. इराणच्या हल्ल्यात इस्रायलमधील दोन नागरिक जखमी झाले होते. तर एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला होता. आता इराणच्या याच हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्य तयारीत इस्रायल आहे. इराणने स्वत:च्या हल्ल्याला इस्माइल हानियेह आणि हिजबुल्लाह म्होरक्या हसन नसरल्लाहच्या मृत्यूचा सूड ठरविले होते. यापूर्वी 13 एप्रिल रोजी देखील इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article