महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्रायल-सौदी संबंध प्रस्थापित होणार

06:22 AM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गाझामधील संघर्ष रोखण्याची अट : ट्रम्प यांच्या प्रयत्नांना मिळतेय यश

Advertisement

वृत्तसंस्था/ रियाध

Advertisement

पाकिस्तान, बांगलादेश, तुर्किये आणि इंडोनेशिया यासारख्या 8 मुस्लीम देशांच्यासंघटनेची गुरुवारी बैठक होणार आहे. ही बैठक इजिप्तमध्ये होणार असून यात इस्रायल विरोधात प्रस्ताव मांडला जाणार आहे. याचदरम्यान जगातील सर्वात शक्तिशाली मुस्लीम देश असलेल्या सौदी अरेबियाने या देशांना मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाकडून इस्रायलसोबत पडद्याआडून चर्चा सुरू असून संबंध प्रस्थापित करण्यावरून लवकरच एक करार होऊ शकतो. सौदी अरेबियाने गाझामधील संघर्ष थांबल्यावर इस्रायलसोबतचे संबंध पुढे नेता येणार असल्याचे म्हटले आहे. चर्चेची ही पूर्ण प्रक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून होत आहे.

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाची डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. विशेषकरून ट्रम्प यांच्याकडून मध्यपूर्वेसाठी नियुक्त करण्यात आलेले प्रतिनिधी स्टीव विटकॉफ या बैठकीला हजर होते.

गाझामधील संघर्ष थांबविण्यात आला तर सौदी अरेबिया संबंध प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे सलमान यांच्याकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आले ओ. अमेरिकेकडून पॅलेस्टाइनसंबंधी वक्तव्य जारी केल्यास इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करण्यास सोपे ठरेल अशी भूमिका सौदी अरेबियाने या बैठकीत मांडली आहे. यामुळे तुर्किये, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि इराण यासारख्या इस्लामिक देशांपेक्षा वेगळ्या मार्गावर सौदी अरेबिया वाटचाल करत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

गाझाऐवजी स्वत:च्या आर्थिक हितसंबंधांना सौदी अरेबिया अधिक प्राथमिकता देत आहे. धर्माच्या नावावर होणाऱ्या ध्रूवीकरणाच्या जागतिक राजकारणात गुंतून पडण्याची सौदी अरेबियाची इच्छा नाही. याच्याऐवजी व्हिजन 2030 च्या अंमलबजावणीत अमेरिका, इस्रायल यासारख्या देशांकडून गुंतवणूक मिळविण्याचा सौदीचा प्रयत्न आहे.  कच्च्या तेलाच्या पुरवठ्याच्या व्यतिरिक्त अन्य आर्थिक स्रोत निर्माण करण्याचे धोरण सौदी अरेबियाने स्वीकारले आहे. अशा स्थितीत सौदी अरेबियाकरता इस्रायल, अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यासारख्या देशांसोबत मधूर संबंधा राखणे महत्त्वाचे ठरले आहे.

इस्रायलच्या शस्त्रास्त्रांची आवश्यकता

सौदी अरेबिया इस्रायलची क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा आयर्न डोम खरेदी करू इच्छित आहे. याचबरोबर सौदी अरेबिया इस्रायलमध्ये निर्मित स्पायवेअरचा वापर करतो. याच्या मदतीने सौदीत राजघराण्याच्या विरोधकांवर नजर ठेवली जात आहे. 2020 मध्ये झालेल्या अब्राहम करारामागे देखील सौदी अरेबियाची भूमिका होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article