महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इस्लामपुरात गुंडांकडून दहशत माजवत एकावर हल्ला ! कोयत्यांचा वापर : अपहरण करुन मारहाण

05:01 PM Sep 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
Crime Koyta
Advertisement

10 संशयीतांचा समावेश

Advertisement

इस्लामपूर प्रतिनिधी

शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी बेकायदा जमाव जमवून राडा केला. केबीपी कॉलेज जवळील आनंदनगर मधील तोसीफ इस्माईल मगदूम(33) या वाहन चालकाचे अपहरण करुन कोयत्याने हल्ला करुन गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास 80 फुटी रोड रसिदा पटेल यांच्या घराच्या पाठिमागील रोडवर घडली.या गुन्हयात एका अनोळखीसह 10 जणांचा समावेश आहे.

Advertisement

वैभव विक्रम पाटील, जय शिंदे, अनमोल मदने, तन्वीर मणेर, गणेश वडे, राहुल पुजारी, राजू पुजारी, निरंजन पाटील, बीरु पुजारी, या संशयीतांचा समावेश आहे. यातील पाटील याच्या विरुध्द यापूर्वी मोकासह अनेक गंभीर गुन्हयांची नोंद आहे. मदने व मणेर याच्या विरुध्द ही अनेक गंभीर गुन्हे आहेत. यामध्ये खुनी हल्ला, जुगार अधिनियम, महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रति अधिनियम अन्वये गुन्हयांचा समावेश आहे.

बुधवारी रात्री बेकायदा जमाव जमवून फिर्यादीकडे जावून अकीब पटेल व सौरभ पाटील कुठे आहेत, अशी विचारणा केली. दरम्यान त्यांनी दहशत माजवली. मगदूम यांनी माहित नाही, असे म्हणाल्यावर शिवीगाळ करीत वैभव पाटील याने मुस्काडीत मारुन हातातील लांब कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. तर शिंदे याने ऊस तोडीच्या कोयत्याने मगदूम याच्या पाठीत वार केला. तशा स्थितीत मगदूम यास स्कुटी गाडीवर बसवून वडे याने वैभव पाटील याच्या घरी नेवून दहशत माजवली. यावेळी अन्य आरोपींनी मगदूम यास लाथाबुक्यांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अपहरण, गंभीर दुखापत यांसह भारतीय हत्यार अधिनियम कलम 4, 25, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
gangsters coyotasIslampur attacked
Next Article