For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्कॉन इंडियाचे अध्यक्ष गोपालकृष्ण गोस्वामी यांचे निधन

06:06 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्कॉन इंडियाचे अध्यक्ष  गोपालकृष्ण गोस्वामी यांचे निधन
Advertisement

वृत्तसंस्था/ देहरादून

Advertisement

इस्कॉनच्या सर्वात वरिष्ठ संन्याशांपैकी एक आणि इस्कॉन इंडियाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष गोपालकृष्ण गोस्वामी यांचे रविवारी देहरादूनमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांच्या भक्तांमध्ये शोक पसरला आहे. गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांचे पार्थिव शरीर सोमवारी वृंदावन येथे आणले जाणार आहे. इस्कॉन मंदिरात प्रभुपाद यांच्या समाधीनजीकच पार्थिव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

गोपालकृष्ण गोस्वामी यांचे जगभरात लाखो भक्त आहेत. हे भक्त अंत्यदर्शनासाठी वृंदावनच्या इस्कॉन मंदिरात पोहोचणार असल्याची इस्कॉन मंदिर, वृंदावनचे पदाधिकारी बृजधाम दास यांच्याकडून माहिती देण्यात आली. गोपालकृष्ण गोस्वामी महाराज हे अलिकडेच एका मंदिराच्या शिलान्यास कार्यक्रमात सामील झाले होते. तेथे घसरून पडल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

Advertisement

1944 मध्ये नवी दिल्लीत जन्मलेले गोपालकृष्ण गोस्वामी महाराज यांना सोरबोन विद्यापीठ (फ्रान्स) आणि मॅकगिल विद्यापीठात (कॅनडा) अध्ययन करण्यासाठी दोन शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या होत्या. 1968 मध्ये कॅनडात इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांची भेट झाल्यावर गोपालकृष्ण गोस्वामी महाराज यांनी शांतता आणि कल्याणासाठी भगवान कृष्ण आणि सनातन धर्माच्या उपदेशांना सर्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वत:ला समर्पित केले होते.

Advertisement
Tags :

.