कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयएस’च्या साकिब नाचनचा दिल्लीत उपचारावेळी मृत्यू

06:31 AM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेचा भारतातील प्रमुख साकिब अब्दुल हमीद नाचन याचे 28 जून रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात निधन झाले. 57 वर्षीय नाचनला मंगळवारी मेंदूतील रक्तस्रावामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने शनिवारी दुपारी 12:10 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. 2023 पासून तो तिहार तुरुंगात होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चार दिवसांपूर्वी त्याला प्रथम दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात आणि नंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Advertisement

महाराष्ट्रातील ठाणे जिह्यातील पडघा गावातील रहिवासी साकिब नाचन हा पूर्वी स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) चा सक्रिय सदस्य होता. एनआयएने डिसेंबर 2023 मध्ये दिल्ली-पडघा आयएस मॉड्यूल प्रकरणात साकिब नाचन याला अटक केली होती. त्याच्यावर भारतात आयएसआयएसच्या कारवायांना प्रोत्साहन देण्याचा आरोप होता. तो तरुणांना कट्टरपंथी बनवण्याच्या कटात, दहशतवादी संघटनेसाठी निधी उभारण्याच्या आणि स्फोटक साहित्य तयार करण्याच्या कटात सहभागी होता. त्याने स्वतत:ला आयएसआयएसचा अमीर-ए-हिंद म्हणून घोषित केले होते.

1990 च्या दशकात नाचनचे नाव खलिस्तानी गटांशी सहकार्य करून दहशतवादाचे कट रचल्याबद्दल पुढे आले. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 1997 मध्ये त्याला शिक्षा सुनावली. 2002-2003 दरम्यान मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्येही नाचनचे नाव पुढे आले होते. या हल्ल्यांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी त्याला 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article