For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएसआय एजंटला मेरठमधून अटक

06:41 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयएसआय एजंटला मेरठमधून अटक
Advertisement

मॉस्कोतील दुतावास कर्मचारी : पाकिस्तानी महिलेला पुरविली गोपनीय माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ मेरठ

उत्तर प्रदेशच्या एटीएसच्या पथकाला रविवारी मोठे यश मिळाले. आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एका भारतीय एजंटला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे. सदर अधिकारी रशियातील भारतीय दुतावासात कार्यरत होता. गुप्तचर विभागाकडून उत्तर प्रदेश एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित गुप्तहेराला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सखोल चौकशीत सत्येंद्रने गुन्ह्याची कबुली दिली.

Advertisement

परराष्ट्र मंत्रालयात एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ) पदावर कार्यरत सत्येंद्र सिवाल याला अटक करण्यात आल्याची माहिती एटीएसने रविवारी दिली. त्याच्यावर आयएसआयसाठी काम केल्याचा आरोप आहे. सत्येंद्र हा मूळचा उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील रहिवासी असून तो मॉस्को येथील भारतीय दुतावासात सेवेत होता. गुप्तचर विभागाच्या तपासात तो आयएसआय हँडलर्सच्या नेटवर्कमध्ये सामील होऊन भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे आणि पैशाच्या नावाखाली त्यांना महत्त्वाची गोपनीय माहिती पुरवत असल्याचे उघड झाले आहे.

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे हँडलर काही लोकांना भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना आमिष दाखवत असून माहितीच्या बदल्यात त्यांना पैशाचे आमिष देत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. महत्त्वाची गोपनीय आणि प्रतिबंधित माहिती आयएसआय हस्तकांना पुरविली जात असून भारताच्या अंतर्गत आणि बाह्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्मयताही व्यक्त करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याशी संबंधित सामरिक आणि सुरक्षाविषयक माहिती पुरविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सत्येंद्र सिवाल नामक दुतावास कर्मचाऱ्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

उत्तर प्रदेश एटीएसने संबंधित कर्मचाऱ्यावर पाळत ठेवून पुरावे गोळा केले. अटक करण्यात आलेला सत्येंद्र सिवाल हा भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयांतर्गातील विभागातील एमटीएस म्हणून नियुक्त असून तो सध्या भारतीय दुतावासात कार्यरत होता. तो सध्या पाकिस्तानातील महिला हँडलरला महत्त्वाची माहिती पुरवत असे. ठोस पुरावे मिळाल्यानंतर सिवाल याला एटीएस फील्ड युनिट मेरठ येथे बोलावून त्यांची चौकशी केली. हँडलरला पाठवलेल्या माहितीबद्दल विचारणा केली असता तो योग्य उत्तर देऊ शकला नाही.

सत्येंद्र 2021 पासून रशियातील मॉस्को येथील भारतीय दूतावासात आयबीएसए (भारत आधारित सुरक्षा सहाय्यक) म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात आले. आरोपींविऊद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक ओळखपत्र आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.