Ishwarpur Name: 'ईश्वरपूर' नामांतरणास केंद्र सरकारची मंजुरी
05:26 PM Oct 25, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
९८ वर्षाच्या मागणीला अखेर यश
Advertisement
ईश्वरपूर: गेल्या ९८ वर्षापासून इस्लामपूरचे 'ईश्वरपूर' नामांतर करण्याची मागणी अखेर अधिकृतपणे पूर्ण झाली. या नामांतरणाच्या प्रस्तावास केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने त्याचा अध्यादेश जारी केला आहे.
यापुढे सर्व शासकीय कार्यालये, दस्ताऐवज, रेल्वे, पोस्ट नोंदीमध्ये शहराचा उल्लेख 'ईश्वरपूर' असा होणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाच्या भारतीय सर्व्हेक्षण विभागाने तसा अध्यादेश काढला असून शासकीय कार्यालयासह संबंधीत खात्याच्या विभागांना त्यांच्या दप्तरी शहराचे नाव बदलण्याच्या सूचना केल्या आहेत.
Advertisement
१९२७ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेगडेवार यांनी इस्लामपूरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शहराचा उल्लेख ईश्वरपर असा केला होता.
Advertisement